Ruchika Jadhav
मऊ आणि गोड खरवस खायला सर्वांनाच आवडतो.
मात्र यासाठी चिकाचं दूध लागतं. त्याशिवाय खरवस बनवायचा कसा हे जाणून घेऊ.
चिकाशिवाय खरवस बनवण्यासाठी साधं दूध घ्या.
या दूधात कंडेन्स मिल्क मिक्स करून घ्या.
कंडेन्स मिल्क महत्वाचे आहे. त्याने खरवस सारखं टेक्सचर तयार होतं.
मिश्रण घट्ट करण्यासाठी त्यामध्ये दूधाची पावडरही टाका.
सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
यामध्ये दही देखील मिक्स करा. पुढे हे मिश्रण शिजवून घ्या. तयार झाली खमंग खरवस.