Palak Paratha saam
लाईफस्टाईल

Palak Paratha: मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये द्या पौष्टिक पालक पराठा; विसरून जातील बाहेरचे बर्गर फ्रॅंकी

quick recipes for breakfast: तुम्हालाही नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि चवदार बनवायचे आहे का? जर होय, तर तुम्ही पालक पराठ्याची ही रेसिपी नक्की करून पहा.

Saam Tv

तुम्हालाही नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि चवदार बनवायचे आहे का? जर होय, तर तुम्ही पालक पराठ्याची ही रेसिपी नक्की करून पहा. पालक हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. त्यात लहान मूलं हिरव्या पालेभाज्या खायला टाळतात. अशा वेळेस तुम्ही त्यांना पालक पराठा थोड्या त्यांच्या आवडीच्या पदार्थांपासून तयार करून देऊ शकता. त्याने त्यांना पौष्टिक जेवण मिळेलच , त्याच्यसोबत मूल बाहेरचे पदार्थ खाणे देखील टाळतील.

पालक पराठा बनवण्यासाठी तुम्हाला 250 ग्रॅम पालक लागेल. सर्वप्रथम, तुम्हाला पालक नीट धुवून बारीक चिरून घ्यावे लागेल. त्याऐवजी तुम्ही पालक उकळून पालकाची प्युरीही बनवू शकता. आता तुम्हाला एका मोठ्या भांड्यात २ कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. त्याच भांड्यात चिरलेला पालक, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा टीस्पून सेलरी, अर्धा टीस्पून जिरे, एक इंच किसलेले आले, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 किसलेल्या लसूण पाकळ्या आणि मीठ टाका.

पीठ मळून घ्या

आता हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे. थोडं थोडं पाणी ऍड करत रहा आणि पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या. पीठ मळताना त्यात थोडे तूपही घालू शकता. जेणेकरून पालक पराठे कुरकुरीत होतील. पीठ मळून झाल्यावर ते झाकून ठेवावे लागेल आणि सुमारे 15 मिनिटे ते तसेच सोडावे लागेल. या पद्धतीचा वापर केल्याने पीठ सेट होईल.

आता पिठाचे छोटे गोळे बनवायचे आहेत. सर्व गोळे लाटून घ्या. आपण गोळे कोणत्याही आकारात रोल करू शकता. तुमचा पराठा जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. आता तवा गरम करून थोडे तेल चांगले पसरवा. पराठा तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा लोणी देखील वापरू शकता.

सर्व्ह करण्यासाठी तयार

तुमचे पालक पराठे सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत. हे गरम पालक पराठे तुम्ही दही, लोणी, लोणचे किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पालक पराठ्याची चव आवडेल. न्याहारीसाठी तुम्ही पौष्टिक पालक पराठ्यांचा सहज आनंद घेऊ.....

oil free puri : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT