Sambar Masala Recipe, Homemade sambar masala, Food  Saam Tv
लाईफस्टाईल

Sambar Masala Recipe : घरच्या घरी साउथ इंडियन स्टाइलने बनवा सांबार मसाला, बनेल परफेक्ट; पाहा रेसिपी

South Indian Style Sambar Masala : सकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ हमखास बनवले जातात. अनेकांना तर हे पदार्थ हॉटेलमध्ये जाऊन खायची भारी हौस असते. पण याची चव टिकून राहाते ती सांबार मसाल्यामुळे.

कोमल दामुद्रे

How To Make Sambar Masala At Home :

दाक्षिणात्य पदार्थांची चव चाखायाची झाली की, जिभेवर रेंगाळतात ते इडली, मेदू वडा, डोसा यांसारखे पदार्थ. परंतु, या पदार्थांची चव ही सांबारशिवाय खाणे अपूरीच आहे.

सकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ हमखास बनवले जातात. अनेकांना तर हे पदार्थ हॉटेलमध्ये जाऊन खायची भारी हौस असते. पण याची चव टिकून राहाते ती सांबार मसाल्यामुळे. प्रत्येक गृहिणीची सांबार बनवण्याची पद्धत आणि चव वेगळीच असते. जर तुम्हालाही हॉटेलसारख्या सांबाराची चव चाखायची असेल तर रेसिपी (Recipe) पाहा.

1. साहित्य

  • १० ते १२ लाल मिरच्या

  • ४ चमचे काळी मिरी

  • १ कप कढीपत्ता

  • अर्धा कप धणे

  • २ चमचे उडीद डाळ

  • २ चमचे चणाडाळ

  • २ मोठे चमचे तुरडाळ

  • २ चमचे तांदूळ (Rice)

  • २ चमचे मोहरी

  • ३ चमचे जिरे

  • २ चमचे मेथी दाणे

  • २ चमचे हिंग

  • २ चमचे हळद (Turmeric)

2. कृती

  • सांबार मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी कढई गरम करुन चणाडाळ, उडदाची डाळ, तांदूळ आणि मेथीचे दाणे चांगले भाजून घ्यावेत.

  • त्यानंतर भाजलेले पदार्थ थंड होण्यासाठी ठेवून द्या.

  • त्याच पॅनमध्ये धणे, जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून कोरडे भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा.

  • त्यानंतर लाल सुक्या मिरच्या व सुके खोबरे वेगवेगळे कोरडे भाजून घ्या.

  • भाजलेले सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात हळद, मीठ व काश्मिरी लाल मिरची पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ताईला मानलं राव...भल्या मोठ्या नागाला पकडण्यासाठी केली कसरत; VIDEO पाहून मनात भरेल धडकी

US Presidential Election Result: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत १९८ मतं; कमला हॅरीस यांना किती मतं?

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT