Homemade Winter Moisturizer Saam Tv
लाईफस्टाईल

केमिकल्स क्रिम्सना म्हणा बाय बाय, हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा मॉइश्चरायझर; जाणून घ्या सोपी पद्धत

Homemade Winter Moisturizer: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? घरच्या घरी मॉइश्चरायझर कसे बनवायचे आणि हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या.

Manasvi Choudhary

Homemade Moisturizer How To Make At Home:

हिवाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्वचेवरची साल निघते तर कधी खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी त्वचा ओलसर ठेवणे अत्ंयत महत्वाचे आहे. अनेकजण यावर उपाय म्हणून बाजारात मिळणारी क्रिम आणि लोशन वापरतात. परंतु बाजारातील महागड्या केमिकल्सयु्क्त क्रिम्स लावण्यापेक्षा तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने घरगुती मॉइश्चरायझर बनवू शकता. यासाठी नेमकं काय काय करायचं? घरीच मॉइश्चरायझर बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.

मॉइश्चरायझर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

शिया बटर

खोबरेल तेल

बदामाचे तेल

मधमाशांचे मेण

व्हिटॅमिन ई तेल

लव्हेंडर ऑईल

शिया बटर आणि बदामाचे तेल वापरून घरीच मॉइश्चरायझर कसे बनवायचे?

सर्वातआधी, एका भांड्यामध्ये शिया बटर, खोबरेल तेल आणि मधमाश्यांचे मेण एकत्र करून मिश्रण मंद आचेवर वितळवून घ्या. सर्व मिश्रण व्यवस्थित वितळल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड करून घ्या. मिश्रण थंड झाले की त्यात बदामाचे तेल आणि व्हिटॅमिन ई तेल मिक्स करा. मिश्रण क्रिमी होईपर्यत चांगले फेटून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी मॉइश्चरायझर तयार होईल ते कोरड्या काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा.

मॉइश्चरायझरमधील घटक कसे काम करतात?

  • शिया बटर त्वचेवरील कोरडेपणा कमी करून त्वचा ओलसर करण्यास मदत करते.

  • बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते. तर नारळाचे तेल त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते.

  • मधमाशांचे मेण त्वचेवर हलका थर निर्माण करते ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

मॉइश्चरायझर लावताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • मॉईश्चरायझर कधीही अंघोळीनंतर लावावे. त्वचा किंचित ओलसर असताना मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

  • चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करा.

  • घरगुती मॉइश्चरायझर स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा.

  • मॉइश्चरायझरच्या रंगात, वास किंवा गुणधर्मात काही बदल जाणवल्यास वापरणे टाळा.

  • हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी.

  • दिवसभर पुरेसे पाणी प्या.

  • अंघोळीसाठी खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.

  • त्वचा जोरात घासू नका.

  • त्वचेसाठी सौम्य क्लिन्झर वापरा.

  • आहारात सुकामेवा, बिया, फळांची समावेश करा.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लालबाग येथे ठाकरेसेनेचे आंदोलन; बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्या प्रकरणात नागरिक आक्रमक

Maharashtra : पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त गावांना दिलासा

Men Diet By Age : पुरुषांनो, वयानुसार बदला तुमचा आहार! २०, ४० अन् ६० व्या वर्षी काय खावे?

Shaina NC: आधी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला, आता शायना एनसींनी माफी मागितली

कॉफी की पाणी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय पिणे आरोग्यासाठी फायदेशीर?

SCROLL FOR NEXT