Manasvi Choudhary
सफरचंद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. परंतु, सफरचंद कापल्यानंतर जर ते लगेच खाल्ले नाही, तर ते काळे पडते.
अनेकदा सफरचंद काळे पडले की खावेसे वाटत नाही. सफरचंद कापल्यानंतर काळे पडू नये म्हणून काय करावे जाणून घ्या.
सफरचंदामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाइम्स असते ज्यामुळे सफरचंद कापल्यानंतर हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येताच काळे पडते.
सफरचंद कापल्यानंतर त्याचा रंग बदलला की ते खराब झाले असे नाही. तर कापलेले सफरचंद खूप वेळ उघडे ठेवून खाणे आरोग्यासाठी योग्य नसते.
सफरचंदाला विचित्र किंवा आंबट वास येत असेल, किंवा ते नेहमीपेक्षा जास्त मऊ आणि बुळबुळीत झाले असेल, तर ते खाणे टाळावे.
कापलेल्या सफरचंदाच्या फोडींवर थोडासा बाचा रस टाका. लिंबातील सायट्रिक ॲसिड सफरचंदाला काळे होण्यापासून रोखते.
कापलेले सफरचंद हवाबंद डब्यामध्ये ठेवा.
सफरचंद कापल्यानंतर थंड पाण्यामध्ये ठेवा. थंड पाण्यात सफरचंद ठेवल्यामुळे काळे पडत नाही.