कॉफी की पाणी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय पिणे आरोग्यासाठी फायदेशीर?

Manasvi Choudhary

कॉफी

सकाळी उठल्यानंतर नाश्त्याआधी कॉफी पिण्याची सवय अनेकांना असते. परंतु, आजकाल अनेक फिटनेसप्रेमी कॉफी पिण्याआधी दिवसाची सुरुवात साध्या किंवा कोमट पाण्याने करतात.

coffee | pinterest

पाणी की कॉफी

तर अनेकांना प्रश्न पडतो की, सकाळी उठल्यानंतर सर्वातआधी कॉफी की पाणी काय प्यावे?

Coffee Or Water | yandex

सकाळी सर्वात आधी पाणी पिण्याचे फायदे

आपल्या शरीरामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. रात्रभर झोपल्यानंतर सकाळी शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यासाठी पाणी पिणे फायदेशीर आहे.

water | pinterest

आरोग्यासाठी फायदेशीर

सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायल्याने शरीराचे रक्ताभिसरण सुधारते, शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि पचनक्रिया सुरळीत सुरू होते.

Water | pinterest

शरीरात पाणी कमी झाले असेल तर काय होते?

जर सकाळी शरीरात पुरेसे प्रमाणात पाणी नसेल, शरीरातील पाण्याची पातळी खालावली, तर आळस आणि थकवा यासारंख्या समस्या उद्भवतात. तसेच डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास वाढण्याची शक्यता असते.

water | pinterest

कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्यावे की नाही?

कॉफीमध्ये कॅफीन असते, ज्यामुळे शरीरात अनेक बदल घडतात. कॅफीनच्या सेवनामुळे लघवीचे प्रमाण वाढू शकते.

रिकाम्या पोटी थेट कॉफी प्यायल्याने ॲसिडिटी किंवा पोटाची जळजळ देखील होऊ शकते.

Coffee Or Water | Google

पाणी कधी प्यावे?

कॉफी पिण्याच्या एक ते दोन तास आधी पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

water | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: सफरचंद कापल्यानंतर काळे पडू नये म्हणून काय करावे?

Apple Storage Tips
येथे क्लिक करा.. .