Green Chill Pickle Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Green Chill Pickle Recipe : घरच्या घरी बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं, शेफ पंकजानी दिल्या टिप्स

How To Make Green Chilli Pickel : ताटाच्या डाव्या बाजूला हमखास वाढले जाते ते लोणचं. जेवणाच्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी लोणचे हे आपल्या ताटात असतेच. घरात हल्ली लोणचे बनवताना दिसत नाही.

कोमल दामुद्रे

Cooking Tips For Green Chill Pickle :

ताटाच्या डाव्या बाजूला हमखास वाढले जाते ते लोणचं. जेवणाच्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी लोणचे हे आपल्या ताटात असतेच. घरात हल्ली लोणचे बनवताना दिसत नाही.

बाजारामध्ये हल्ली सहज बंद डब्यात लोणची मिळतात. पण घरी बनवलेल्या लोणच्याची चव ही अधिकच चविष्ट असते. जर तुम्हालाही झणझणीत घरच्या घरी हिरव्या मिरचीचे लोणचे बनवायचे असेल तर शेफ पंकजा भदौरिया यांच्या या टिप्स फॉलो करा. लोणचे बनवण्यासाठी १० मिनिटांच्या आत बनवता येईल. पाहूया सोप्या कुकिंग टिप्स (Tips).

टिप 1

एका पातेल्यात १/४ कप बडीशेप, १ चमचा मेथी दाणे, १/४ कप मोहरी टाका आणि त्याचा वास येईलपर्यंत चांगले भाजून घ्या. यानंतर गॅस बंद करुन थंड झाल्यानंतर त्याची भरड तयार करा.

टीप - २

सुक्या मिरच्यांमध्ये एक चमचा हळद (Turmeric), १ चमचा काश्मिरी लाल तिखट, २ चमचे मीठ, आणि तयार केलेले लोणचे मसाला, १ टेबलस्पून कलोंजी, १/४ कप व्हाइट व्हिनेगर घालून नीट मिसळा.

टीप - ३

यानंतर कढईत एक कप मोहरीचे तेल (Oil) गरम करा. त्यानंतर गॅस बंद करुन त्यात तेल थंड होऊ द्या. कोळशाचा तुकडा गरम करुन घ्या. मोहरीचे तेल थंड झाल्यानंतर १/४ चमचा हिंग घालून हिरव्या मिरचीच्या लोणच्यावर टाका. त्यानंतर लोणचे डब्ब्यात ठेवा

टीप - ४

लोणची नेहमी कोरड्या काचेच्या किंवा सिरॅमिक भांड्यात ठेवा. त्यामुळे लोणचे अधिक काळ टिकेल.

टीप - ५

काचेच्या बरणीत लोणचे मुरण्यासाठी ठेवा. गरम कोळशात हिंग घालून बरणीत थोडावेळ ठेवा. ज्यामुळे लोणच्याला चांगली चव येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT