Ganesh Chaturthi Special  Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi Special : तोंडात टाकाताच विरघळेल, गुलकंदाचे लाडू; ठेवा बाप्पाच्या प्रसादात

कोमल दामुद्रे

Ganesh Chaturthi Special : गणरायाचे आगमन घरोघरी झाल्यानंतर रोज प्रसादात काय ठेवायचे हा प्रश्न पडतो. बाप्पाला मोदक-लाडूचा नैवेद्य तर दाखवला जातो. परंतु, यंदाच्या वर्षी आपण बाप्पासाठी काहीतरी वेगळा नैवेद्य करुया.

काजू, नारळ, गुलकंद व चॉकलेटपासून आपण लाडू किंवा ट्रफल्स बनवू शकतो. जे दिसायला अगदी चॉकलेट सारखे असतात. पण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.

गुलकंद हे शरीरासाठी चांगले असते. याचे सेवन केल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो. याचे नियमित सेवन केल्यास मेंदूसाठी फायदेशीर आहे. कफ व अपचनाच्या समस्येवर गुणकारी आहे.

जाणून घेऊया गुलंकदाच्या लाडूची टेस्टी अशी रेसिपी

साहित्य : -

सुक्या नारळाचा किस - १/२ कप

साजूक तूप - १ मोठा चमचा

खसखस - १/२ चमचा

काजू - १/२ कप

वेलची पावडर - १/८ चमचा

कंडेन्स्ड मिल्क - ३ चमचे

गुलकंद - १ मोठा चमचा

चिमूटभर केशर- १ चमचा कोमट दुधात ५ मिनिटे भिजवा.

सजवटीसाठी सुके खोबरे

१०० ग्रॅम चॉकलेट १ चमचा वितळलेल्या लोणीत/ खोबरेल तेल किंवा वनस्पती तेलात मिसळा.

कृती -

- नारळाचा (Coconut) किस सर्वप्रथम तुपात तपकिरी होईपर्यंत चांगले भाजून घ्या.

- नंतर त्यात खसखस घालून ती लालसर होईपर्यंत पुन्हा भाजून घ्या.

- काजू पावडर आणि वेलची पावडर घालून मिक्स करा. कंडेन्स्ड मिल्क, गुलकंद पेस्ट आणि केशर दूध (Milk) घालून एकत्र होईपर्यंत मिसळा

Rose petal jam laddu

- मिश्रण गॅसवरून उतरवा आणि गरम असतानाच लहान गोळे बनवा आणि ट्रेवर ठेवा

- त्यांना नारळाच्या किसात वरुन फिरवून घ्या शकता किंवा फ्रिजमध्ये १० ते २० मिनिटे घट्ट होईपर्यंत थंड करू शकता. चॉकलेट + लोणी / तेलाच्या मिश्रणात बुडवून घ्या व ट्रेवर ठेवा.

- चॉकलेट सेट होण्यापूर्वी लगेच गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT