गणेशोत्सव हा महाराष्ट्रात जितक्या आनंदात साजरा होतो तितकाच तो, देशाच्या इतर भागांतही धूमधडाक्यात साजरा होतो. कारणही तसेच आहे सान -थोर , गरीब- श्रीमंत , जाती-धर्म , साम्य- भेद या पलीकडे जाऊन ज्या देवाशी मानवाने जास्त जवळीक साधली आहे , तोच हा शिव पार्वतीचा सुकुमार पुत्र !
गणेशोत्सव म्हटल की धमाल, मज्जा-मस्ती आलीच. या सणामध्ये बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते आणि बाप्पाचे आवडते सगळे पदार्थ तयार केले जातात. बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक.
घरोघरी बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक तयार केले जातात. मोदकाचे अनेक प्रकार आहेत. त्यातले उकडीचे मोदक बाप्पाला खूप आवडतात असे म्हटले जाते. पण त्याच प्रकारे आपण बाप्पासाठी तळलेले मोदक सुध्दा बनवतो. पारंपारिक पद्धतीने उकडीचे मोदक जसे घरोघरी तयार करतात तसेच तळलेले मोदक सुध्दा तयार करतात. तळलेले मोदक अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात.
गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीला प्रसाद म्हणून प्रामुख्याने मोदक बनवले जातात. चला तर मग पाहुयात तळलेल्या मोदकाची रेसिपी.
साहित्य -
गव्हाचे पीठ - १/२ कप
बारीक रवा - १/२ कप
चणा डाळ - १/२ कप
किसलेले ओले खोबरे (Coconut) - २ कप
किसलेला गूळ - ३/४ कप
खसखस - २ मोठे चमचे
पांढरे तीळ - १ मोठा चमचा
वेलची पावडर - १ चमचा
तूप - २ मोठे चमचे
चिमूटभर मीठ
तेल (Oil)
पाणी गरजेनुसार
कृती -
१. आदल्या रात्री चणाडाळ भिजत घालायची. त्यानंतर मिक्सरमध्ये डाळीत जास्तीचे पाणी काढून ती व्यवस्थित मॅश करुन घ्या.
२. मोदकाचे सारण बनवण्यासाठी एका कढईत २ टेबलस्पून तूप गरम करावे . त्यात किसलेला गूळ घालून पूर्णपणे मंद आचेवर वितळवून घ्या. मग त्यात किसलेले ओले खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे . हे सारण शिजवून घट्ट होऊ द्यावे.
३. आवडत असल्यास सुक्या मेव्याचे काप घालू शकता. आता वेलची पावडर घालून एकत्र करावे आणि गॅस वरून भांडे उतरवून सारण पूर्ण थंड होऊ द्यावे .
४. गव्हाचे पीठ आणि बारीक रवा यात किंचीत मीठ घालून हाताने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे.(पिठ मळण्या आधी या पिठात तेलाचे कडकडीत मोहन घालावे . तेल गरम असले की मोदकांची पारी खुसखुशीत बनते.)
५. कणकेच्या गोळ्यावर तेलाचा हात लावून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे .
६. आपल्याला हव्या त्या आकाराचे मोदक हाताच्या साह्याने किंवा साच्यात भरून बनवून घ्यावेत.
७. मोदक तळण्यासाठी कढईत मोदक बुडतील इतके तेल गरम करण्यास ठेवावे , नाहीतर मोदक एक सारखे तळले जात नाहीत. मध्यम आचेवर तेल चांगले गरम करून घ्यावे. नंतर मंद आचेवर ते मध्यम ठेवून कढईत सुटसुटीत रित्या तळता येतील एवढेच मोदक तळावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.