Chocolate Ice-cream Recipe : दरवर्षी 7 ते 14 फेब्रुवारी महिन्यात लोक व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा करतात. चॉकलेट डे दरवर्षी 9 फेब्रुवारीला साजरा केला जातो, तो व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस असतो.
प्रेमाच्या या मोसमात या दिवशी जोडपे आपल्या जोडीदाराला आवडते चॉकलेट देऊन आपल्या मनतील भावना व्यक्त करतात. एकमेकांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचे काम करतात.तक्रारी दूर करून जवळीक वाढवतात.
आपल्या पार्टनर (Partner) यंदा खूश करायचे असेल तर चॉकलेट न देता त्याचे आइस्क्रीम बनवू खाऊ घाला. रेसिपीनुसार बनवले तर तुमचा जोडीदार खरोखरच बोटे चाटत राहील, चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट आइस्क्रीम कसे बनवायचे
1. साहित्य
2. कृती
कोणत्याही मिक्सिंग बाऊलमध्ये क्रीम ठेवा आणि 2 ते 3 मिनिटे चांगले फेटून घ्या.
क्रीम व्यवस्थित बसवा, क्रीम बीट करण्यासाठी बीटर वापरणे आवश्यक आहे, लक्षात ठेवा जोपर्यंत क्रीम फ्लफी होत नाही तोपर्यंत आइस्क्रीम चांगले होणार नाही.
दुसऱ्या स्वच्छ वाडग्यात, तुम्हाला कोको पावडर चाळायची आहे. त्यात दालचिनी पावडर देखील घाला (नेहमी फिल्टर केल्यानंतर कोको पावडर वापरा).
दोन चमचे व्हीप्ड क्रीम घाला आणि चांगले मिसळा.
नंतर या मिश्रणात सर्व क्रीम टाका आणि चांगले मिसळा.
हे खास बनवण्यासाठी तुम्ही त्यावर ड्राय फ्रूट्स टाकू शकता.
जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या मिश्रणात ओरियो बिस्किटे देखील ठेवू शकता.
हे मिश्रण सुमारे ३ तास फ्रीजमध्ये ठेवा.
३ तासांनंतर तुमचे चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे, त्यावर चोको चिप्स टाकून सर्व्ह करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.