Chana Dal Vada Waffles Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Chana Dal Vada Waffles Recipe : चणाडाळीपासून बनवा टेस्टी वेफल्स; मिळेल भरपूर प्रोटीन्स, पाहा Video

Breakfast Snacks : पाऊस पडतो तेव्हा अनेकांना चमचमीत व टेस्टी फूड खायची इच्छा होते. परंतु, तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला खरेतर कंटाळा येतो.

कोमल दामुद्रे

How To Make Chana Dal Vada Waffles : पावसाळ्यात चहासोबत गरमागरम कांदा भजी खायला सगळ्यांनाच आवडते. पाऊस पडतो तेव्हा अनेकांना चमचमीत व टेस्टी फूड खायची इच्छा होते. परंतु, तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला खरेतर कंटाळा येतो.

काहींना भजी, वडा यांसारखे पदार्थ सतत खाण्याची वैताग येतो. आज आम्ही तुम्हाला चणा डाळ वडा वेफल्स सांगणार आहोत. हा आरोग्यदायी, प्रथिनेयुक्त कुरकुरीत नाश्ता आहे ज्यामुळे तुमचा पावसाळा हा अधिक अल्हादायक जाऊ शकतो. याला तळण्याची देखील गरज भासणार नाही. ही रेसिपी इन्स्टाग्राम यूजरने thehealthyrasoi शेअर केली आहे. जाणून घेऊया ही सोपी चणाडाळ वडा वेफल्सची रेसिपी

1. साहित्य

  • चणाडाळ - १ कप

  • लसूण (Garlic) पाकळ्या - २

  • हिरव्या मिरच्या - १ ते २

  • आले - १ तुकडा

  • पालक (Spinach) - १ कप चिरलेला

  • कांदा - १/२ कप चिरलेली

  • कोथिंबीर - १/२ कप चिरलेली सुकी

  • कढीपत्ता - 1 मूठभर चिरलेले

  • जिरे - 1 चमचे

  • मेथीदाणे - 1 चमचे

  • चिमूटभर हिंग

  • मीठ - चवीनुसार

2. कृती

1. सर्व प्रथम चणाडाळ पाण्यात 3 ते 4 तास भिजत घाला. नंतर डाळीचे पाणी काढून ती मिक्सरमध्ये वाटू घ्या.

2. त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा, कोथिंबीर, आले (Ginger), पालक पाण्याने चांगले धुवून चिरून घ्या.

3. चणाडाळीत लसूण, हिरवी मिरची आणि आले घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात पाणी अजिबात टाकू नये.

4. डाळीचे हे मिश्रण एका भांड्यात ठेवा. आता त्यात पालक, कढीपत्ता, मेथीदाणे, हिंग, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे घालून चांगले मिक्स करा.

5. वेफल्स बनवण्यासाठी तुमच्याकडे वेफल मेकर असणे आवश्यक आहे.

6. वेफल मेकरमध्ये थोडे तेल लावा. आता त्यावर थोडे मिश्रण टाका.

7. वेफल मेकर बंद करा आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. थोड्या थोडया वेळाने वॅफल मेकर उघडा आणि तपासत राहा.

8. चहासोबत खा चविष्ट आणि आरोग्यदायी चना डाळ वडा वेफल्स तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT