Aadhaar Card Lock Saam Tv
लाईफस्टाईल

Aadhaar Card Lock : आधार कार्ड लॉक होऊ शकतं? टिप्स आणि ट्रिक्स वाचा

Aadhar Card Lock Tips : UIDAI वापरकर्त्यांना त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये ऑफर करते.

कोमल दामुद्रे

How To Lock Aadhaar Card :

नुकतेच ८१.५ कोटी भारतीयांचा आधार डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची माहिती समोर आली. याबाबतचा खुलासा अमेरिकेतील सायबर सुरक्षा फर्मने एका अहवालातून सादर केला. डार्क वेबवर असलेल्या या डेटामध्ये वापरकर्त्यांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, फोन नंबर आणि इतर तपशील असल्याचे सांगण्यात आले.

आधार कार्ड हे अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. जर तुमच्या आधार कार्डाचा कोणी गैरवापर करत असेल तर तुम्ही ते लॉक करु शकता. यासाठी UIDAI वापरकर्त्यांना त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये ऑफर करते. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आधार कार्ड लॉक करु शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. आधार कार्ड बायोमेट्रिक्स कसे लॉक कराल?

आधार (Aadhaar) बायोमेट्रिक्स लॉक करण्याची पद्धत सोपी आहे. यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर (Website) जावे लागेल. यानंतर तुम्हाला My Aadhaar लॉक आधारचा पर्याय मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्ही तुमचे खाते लॉक करु शकता.

2. आधार लॉक (Lock) करण्याची पद्धत?

  • आधार लॉक करण्यापूर्वी तुम्हाला १६ अंकी व्हर्च्युअल आयडी बनवावा लागेल. त्यानंतर तुम्ही व्हीआयडीच्या मदतीने तुम्ही आधार लॉक किंवा अनलॉक करु शकता.

  • आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/en/ ला भेट देऊ शकते.

  • My Aadhaar च्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर अनेक पर्याय उपलब्ध असतील. यामध्ये तुम्हाला Lock/Unlock या पर्यायवर क्लिक कराव लागेल.

  • व्हीआयडी जनरेट केल्यानंतर, आधार लॉक करण्यासाठी तुम्हाला व्हर्च्युअल आयडी, पूर्ण नाव, पिन कोड, आणि कॅप्चा भरावा लागेल. यानंतर तुम्हाला नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल.

  • OTP टाकून तुम्ही आधार लॉक करु शकता. बायोमेट्रिक्स अनलॉक करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • यासाठी तुम्हाला आधार लॉक ऐवजी आधार अनलॉकचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर व्हीआयडी आणि कॅप्चा टाकून ओटीपी जनरेट करावा लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल.

  • बायोमेट्रिक्समुळे तुमचे आधार सुरक्षित राहिल. व्हीआयडीमुळे तुमचा इतर डेटा सुरक्षित राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT