Flipkart Price Lock Feature : फ्लिपकार्टचे भन्नाट फीचर लॉन्च! सगळ्या सेलमध्ये करता येईल उपयोग, पाहा एका क्लिकवर...कसे वापराचे?

Flipkart Price Lock Feature Launch : सेलपूर्वी कंपनी काही खास फीचर्सवर काम करत आहे, जे येत्या काही दिवसांत फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील.
Flipkart Price Lock Feature
Flipkart Price Lock Feature Saam Tv
Published On

How To Use Price Lock Feature :

फ्लिपकार्टवर लवकरच बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. या सेलपूर्वी कंपनी काही खास फीचर्सवर काम करत आहे, जे येत्या काही दिवसांत फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. यातील एक फीचर म्हणजे Price Lock, ज्याच्या मदतीने ग्राहक प्रोडक्टची किंमत लॉक करू शकतील.

कंपनी दरवर्षी सणासुदीच्या (Festive) काळात बिग बिलियन डेज सेलचे आयोजन करते. यंदा या विक्रीला 10 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे ती आणखी खास असणार आहे. फ्लिपकार्टचे प्राइस लॉक फीचर काय आहे ते जाणून घेऊया ?

Flipkart Price Lock Feature
Flipkart Launches New Platform : फ्लिपकार्टने लाँच केले SPOYL, Gen Z वापरकर्त्यांसाठी अ‍ॅप-इन-अ‍ॅप फॅशनचे नवे प्लॅटफॉर्म

फ्लिपकार्ट प्राइस लॉक फीचर कसे कार्य करेल?

या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रोडक्टची (Product) किंमत लॉक करू शकता, परंतु यातून तुम्हाला काय फायदा होईल? जर तुम्हाला सेलमध्ये कोणतेही प्रोडक्ट खूप कमी किंमतीत मिळत असेल, तर या फीचरच्या मदतीने तुम्ही प्रोडक्टची किंमत लॉक करू शकता आणि नंतर ते खरेदी करू शकता.

याचा अर्थ, सेल चालू राहिले किंवा नाही राहीले तरी तुमच्यासाठी त्या उत्पादनाची किंमत सारखीच राहील. माय स्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार, फ्लिपकार्टचे मुख्य प्रोडक्ट आणि तंत्रज्ञान अधिकारी जयंदाराम वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे. हॉटेल किंवा फ्लाइट तिकिटांच्या किंमती लॉक करतो त्याच पद्धतीने हे फीचर काम करेल.

तुम्ही ते लॉक कसे करू शकाल?

वापरकर्ते निश्चित शुल्क भरून कोणतीही डील लॉक करू शकतात. नंतर, वापरकर्ते ते प्रोडक्ट त्याच किंमतीला खरेदी करू शकतील ज्या किंमतीला त्यांनी ते लॉक केले होते. वेणुगोपाल म्हणाले की, वापरकर्त्यांनी प्रोडक्ट आऊट ऑफ स्टॉक झाल्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण प्रोडक्ट स्टॉकमध्ये येताच त्यांना ते लॉक केलेल्या किंमतीतच मिळेल.

गेल्या दोन वर्षांपासून, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Sale) ऑक्टोबरमध्ये होत आहे. लोक या विक्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रोडक्ट्सवर सूट मिळते. गेल्या वर्षी, बिग बिलियन डेज सेलमध्ये, वापरकर्त्यांनी 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत iPhone 13 खरेदी केला होता, जी आजपर्यंतची सर्वात कमी किंमत आहे.

Flipkart Price Lock Feature
Flipkart Big Saving Days Sale : फ्लिपकार्टची बंपर ऑफर! Apple AirPodsवर तब्बल 10000 रुपयांची सवलत, वाचा सविस्तर

खरं तर, अनेकवेळा सेलमध्ये असे दिसून आले आहे की पहिल्या दिवशी प्रोडक्ट अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होते, परंतु जसजशी विक्री वाढत जाते तसतशी प्रोडक्टची किंमत वाढू लागते. अशा स्थितीत हे फीचर खूप उपयुक्त ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com