Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : सासूबाईंशी अजिबात पटत नाही? सततची भांडणे टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Relationship Tips With Mother in Law : सासूबाईंशी तुमचे सतत वाद होत असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही ट्रिक्स आणल्या आहेत. या टिप्स फॉलो केल्याने सासू आणि तुमचे नाते अगदी आई आणि मुलीप्रमाणे होईल.

Ruchika Jadhav

घर म्हटल्यावर तिथे प्रेम आणि वाद दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. अनेक घरांमध्ये सातत्याने सासू आणि सूना यांच्यात वाद होताना दिसतो. सासू सुनेच्या भांडणामध्ये पती आणि मुलगा दोघांचं मरण होतं. एकीकडे आई तर दुसरीकडे पत्नी या दोघींचे नाते त्याला टिकवायचे असते.

सतत होणाऱ्या भांडणामुळे घरात शांतता राहत नाही. पैसे टिकत नाहीत. तसेच मन समाधानी नसते. तुमच्या घरात देखील सासूबाईंशी तुमचे सतत वाद होत असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही ट्रिक्स आणल्या आहेत. या टिप्स फॉलो केल्याने सासू आणि तुमचे नाते अगदी आई आणि मुलीप्रमाणे होईल.

सकाळी लवकर उठा

भारतात आजही अनेक महिला जुन्या विचारांच्या आहेत. त्यामुळे सुनेने घरात लवकर उठून सर्व कामे पूर्ण करावीत असं प्रत्येक सासूला वाटते. तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय नसेल तर ती सवय लावून घ्या. कारण पहाटे लवकर उठणे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते. सकाळी उठल्यावर घरातील सर्व कामे उरकून घ्या.

देव पूजा करा

सासूबाई घरामध्ये ज्या पद्धतीने देव पूजा करतात तुम्ही देखील त्याच पद्धतीने देव पूजा करण्यास सुरुवात करा. देव पूजा केल्याने घर प्रसन्न राहते. मन शांत राहते. तुम्ही घरासाठी घेत असलेले कष्ट पाहून सासूच्या मनात तुमच्याविषयी असलेला सर्व राग निघून जाईल. तसेच त्या तुमच्याशी प्रेमाने वागतील.

दुर्लक्ष करा

अनेक घरात सासूबाई आपल्या सुनेला सतत कामावरून बोलत असतात. चांगले काम केले तरी त्याचे कौतुक करण्याऐवजी त्यावर ओरडतात आणि चुका काढतात. तुमच्याबरोबर सुद्धा असे घडत असेल तर सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही जितके जास्त दुर्लक्ष कराल तितकेच तुमच्यासाठी चांगले राहील.

शांत रहा

अनेकदा घरामध्ये सासूबाई सुनेवर आपला अधिकार गाजवतात. त्यात त्या सुनेला बऱ्याचदा वाईट बोलतात. सुनेच्या माहेरची परिस्थिती सांगतात. अशावेळी तुम्हाला फार वाईट वाटले तरी सासू बाईंना उलट फिरून बोलू नका. त्या जे काही बोलत आहेत त्याची गुपचूप रेकॉर्डिंग करा. किंवा व्हिडिओ शूट करा आणि तुमच्या पतीला दाखवा. पुढे पती तुमच्या सासूबाईंना योग्य ते उत्तर देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, शेतकरी धास्तावले

Wednesday Horoscope: कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल, पाडव्याचा सण कसा जाणार? वाचा राशीभविष्य...

Bharli Bhendi Recipe : कुरकुरीत अन् झणझणीत भरली भेंडी, चव अशी की खातच राहाल

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुण्याच्या घरात आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT