Early Symptoms Ovarian Cancer  google
लाईफस्टाईल

Ovarian Cancer Symptoms: जेवण जात नाही, झोप होत नाही; गर्भाशयाचा कॅन्सर तर नाही ना? 'ही' लक्षणं असतील तर वेळीच सावध व्हा

Uterine Cancer Signs: महिलांमध्ये वाढणाऱ्या ओव्हरी आणि गर्भाशयाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेत तपासणी केल्यास उपचार शक्य आहेत. लक्षणे जाणून घ्या आणि सावधान राहा.

Sakshi Sunil Jadhav

कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये विशेषत: महिलांना पुढील जीवघेण्या कॅन्सरला सुद्धा सामोरे जावे लागू शकते. महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमधील ओव्हरी कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. हा आजार लवकर ओळखला गेला तर त्यावर योग्य उपचार करता येतात. त्यामुळे ओव्हरी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण भारतामध्ये कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे रुग्ण ९५ टक्के आढळले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे लक्षणे ओळखायची असतील आणि कॅन्सरसंबधीत माहिती मिळवायची असेल तर बातमी शेवट पर्यंत नक्की वाचा.

ओव्हरी कॅन्सर म्हणजे काय?

महिलांच्या प्रजनन प्रणालीतला 'ओव्हरी' म्हणजे अंडाशयांपासून हा कॅन्सर सुरू होतो. बहुतेक वेळा epithelial ovarian cancer या प्रकारात हा कॅन्सर दिसतो. सुरुवातीला लक्षणे सामान्य वाटतात. कधीकधी हा आजार उशिरा ओळखला जातो.

ओव्हरी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे (Early Symptoms)

पोट फुगणे किंवा फुगीरपणा

सतत पोट फुगत असेल तर हे लक्षण दुर्लक्ष करू नका. ही वेदना जर दिर्घकाळ असेल तर हे गर्भाशयाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

भूक कमी होणे

तुमची आधी पेक्षा अचानक भूक कमी होणे. यासोबत वजन अचानक बारिक होणे हे गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतं.

वारंवार लघवी करणे

वारंवार लघवी येत असेल तर याला UTI समजून दुर्लक्ष करू नका.

अस्वाभाविक थकवा

पुरेशी झोप असूनही थकवा जाणवत असल्यास तपासणी करा.

पाळीत बदल

अनियमित रक्तस्त्राव हे लक्षण असू शकते.

पाठीचा खालचा भाग दुखणे

पाठीचा खालचा भाग दुखणं यासोबत पोटातवर दाब जाणवणे हेही संकेत असू शकतात.

पचनासंबंधी त्रास

बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, वारंवार गॅस होणे हीही लक्षणे असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: खोकल्याचं औषध ठरलं विष; 14 मुलांचा मृत्यू, कफ सिरपबाबत सरकारचा निर्णय काय?

Karmala Fort History: मुंबईच्या समुद्रकिनारी असलेले जुने गड, करमाळा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

'जरांगेंना AK47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा' विजय वडेट्टीवार संतापले

मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला, उपसरपंचाचा मुलगा पाण्यात वाहून गेला, २३ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

Nagpur Health Crisis : विषारी औषध की मेंदूज्वर? नागपूर आणि मध्यप्रदेशातील बाल मृत्यूमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT