Sakshi Sunil Jadhav
आपली रास खरंतर पैशाचा विशेष विचार करत नाही. खर्च करताना सुद्धा हात सैल असतो. दिवस चांगला आहे.
कामावर तुमच्याकडून विशेष मेहनत घेतली जाते. आजचा दिवस मेहनतीचे चीज होणार आहे. आपली वाहवा होईल.
बौद्धिक दर्जा सुद्धा चांगला राहील. आज व्यवसायामध्ये विशेष पराक्रम होईल. विष्णू उपासना करावी.
मनाशी वेगळा संवादास साधाल. गूढ गोष्टीं विषयीचे आकर्षण वाढेल. जुन्या काही उत्खननाच्या गोष्टी तुमच्याकडून आज घडतील.
सरकारी कामे गतिशील होतील. जवळच्या लोकांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराचे कौतुक करावे लागेल.
मी आणि माझा असे करून फारसे काही साध्य होत नाही हे आपल्याला आता समजले आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहात.
विद्यार्थ्यांना कलाकारांना क्रीडा क्षेत्रात दिवस आज सुसंधी घेऊन आलेला आहे. कुटुंबीयांपासून धनयोगाचे संभव दिसतो आहे.
घराचे स्वप्न काही अंशी आज पूर्णत्वास येईल किंवा त्या निगडित घटना घडायला लागतील. प्रेमामध्ये मनस्ताप वाढेल.
निर्णय घेताना आज कचराई करू नका. काही वेळेला द्विधा अवस्थेमुळे आपण मागे पडता. नेटाने आणि जोमाने आज काम करावे.
जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी. पैशाचे व्यवहार सुरळीत पार पडतील.
स्वतः विषयीचा एक वेगळा आत्मविश्वास बाळगाल. एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपला प्रवेश होईल.
ठरवून गोष्टी होत नाहीत. आज न ठरवता काही गोष्टी होतील पण त्याचा त्रासही होण्याची शक्यता आहे.