Kitchen tips in marathi, Asafoetida benefits, Asafoetida Benefits in Marathi, Hinga Fayade, kitchen tips and tricks  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

स्वयंपाकघरातील गुणकारी हिंगाविषयी समज-गैरसमज

आपल्या घरामध्येही अन्नपदार्थांत हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचे फायदे आणि चव यानुसार ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मसाल्यातील आणखी एक सुवासिक पदार्थ म्हणजे हिंग. आयुर्वेदात बहुगुणी असणारे हिंग हे अनेक आजारांवर उपयुक्त ठरते. जेवणाच्या चवीसोबतच आरोग्यासाठीही त्याचे अनेक फायदे आहेत. (Asafoetida Benefits in Marathi)

हे देखील पहा -

आपल्या घरामध्येही अन्नपदार्थांत हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचे फायदे (Benefits) आणि चव यानुसार ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सध्या बाजारात हिंगाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. हिंगाच्या सुगंधाने त्याची ओळख वाढत जाते परंतु,अत्यंत सुवासिक असलेले हिंग अनेक वेळा आपल्या जेवणाची चव खराब करते व त्यामुळे आपले आरोग्य (Health) बिघडते. हिंगात अँटिऑक्सिडंट्सचा गुणधर्म आहेत. हिंग खूप महाग असल्यामुळे त्याच्यात अनेक भेसळीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. अशावेळी आपण फसले जातो. खरे आणि खोटे हिंग नेमके कसे ओळखायला कळत नाही. ते ओळखायचे कसे हे जाणून घेऊया. (Kitchen tips)

खरे आणि खोटे हिंग कसे ओळखाल -

१. आपण हिंगाला त्याच्या रंगावरुन ओळखू शकतो. खरी हिंग हलक्या तपकिरी रंगाची असते. त्याचा रंग तपासण्यासाठी गरम तुपात घातल्याने ती फुगते व त्याचा रंग बदलून लाल होतो.

२. खरे हिंग पाण्यात विरघळवूनही ओळखता येऊ शकतो. हिंगाला स्वच्छ पाण्यात (Water) विरघळल्यानंतर पाण्याचा रंग दुधाळ किंवा पांढरा झाल्यीस ते खरे हिंग आहे हे समजावे.

३. खऱ्या आणि खोट्या हिंगातला फरक ओळखण्यासाठी आपण त्याला अग्नीत जाळू शकतो. खरी हिंग आगीत सहज जळते तर, खोटी हिंग आगीत जळल्यानंतरही काही भाग तसाच राहतो.

४. हिंग ओळखण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्याचा सुवास. खरी हिंग हातात घेतल्यावर त्याचा सुगंध बराच वेळ हातातून जात नाही तर ती खरी हिंग आहे.

५. तसेच, हिंग पावडरमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्वयंपाक घरात हिंग पावडर ऐवजी हिंगाचा गोळा घेण्याचा प्रयत्न करा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat Tourism : गुजरातमधील प्रसिद्ध किल्ला, भव्यता पाहून डोळे दिपतील

Urvashi Rautela : उर्वशीच्या चाहत्यांचा स्वॅग लय भारी, अभिनेत्रीचा दुबईत झाला सन्मान

ITR Filling 2025 : फक्त ४८ तास उरले, अजूनही आयकर रिटर्न भरला नाही? आता काय होणार

Nagpur Accident : भयंकर! उड्डाणपुलावर स्कूल व्हॅनची बसला जोरात धडक, विद्यार्थिनी अन् चालकाचा मृत्यू, ८ विद्यार्थी जखमी

सायंकाळी उठला अन् घरासमोरील नाल्यात पडला; ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

SCROLL FOR NEXT