
मुंबई : मे महिना म्हटलं की, उष्णता अधिक वाढत जाते. अशावेळी आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलाव्या लागतात. हवामानाच्या या तीव्र मूडमध्ये, आपले शरीर निरोगी राहणे महत्वाचे आहे. (Summer health tips in Marathi)
हे देखील पहा -
शरीर निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात आहारात बदल करणे गरजेचे आहे. खाण्यापिण्यात आपण अशा गोष्टी निवडल्या पाहिजेत ज्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण बरेच पेय पितो परंतु, आपले पोट भरत नाही. आपल्या आहारात आपण काही फळांच्या (Fruit) सलादाचा समावेश करायला हवा.
या फळांच्या सलादाचा समावेश आहारात करा-
१.उन्हाळ्यात कलिंगड आपल्याला बाजारात सर्वत्र दिसते. या ऋतूमधे कलिंगड खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. त्यात ९०% पेक्षा जास्त पाणी (Water) असते त्यामुळे अधिक उष्णतेमध्येही शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. यासाठी पुदिना, लिंबू आदींचा वापर करुन आपण सलाद बनवू शकतो.
२. डाळिंब आणि किवी ही दोन्ही फळे आपल्या शरीरासाठी अनेक फायदेशीर आहेत. ही फळे मुबलक प्रमाणात पोषकद्रव्ये शोषून घेतात. हे सलाद बनवण्यासाठी डाळिंब, किवी, चीज आणि पुदिन्याची पाने व यात आपण मोहरी, संत्र्याचे तुकडे, लिंबाचा रस, व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल यांचाही वापर करु शकतो.
३. मिक्स फ्रूट सलाद बनवण्यास जितके सोपे आहे तितकेच ते खाण्यास चविष्ट आहे. ते बनवण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणीदार फळांचा यात समावेश करावा.
४. उन्हाळ्यात आंबे (Mango) आपल्याला सर्वत्र दिसतात. आंब्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात परंतु, आपण आंब्यापासून सलाद देखील बनवू शकतो. आंब्याची कोशिंबीर उन्हाळ्यातही तितकीच फायदेशीर आहे. ते बनवण्यासाठी आपण लाल तिखट, आंबा, लिंबाचा रस आणि मीठ घालून आंबा मसालेदार बनवू शकतो.
५. तसेच, जामुन सलाद देखील उन्हाळ्यात शरीरासाठी अधिक उपयुक्त ठरते. सलाद तयार करण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईल, लिंबू, मिरची आणि चिमूटभर मीठ घालून बनवू शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.