सणासुदीच्या काळात सोनं खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. सोन्याच्या वाढत्या भावामुळे गुंतवणुकदारांचा कल खरेदीसाठी कमी पाहायला मिळत आहे. परंतु, मागील दिवाळीत सोन्या- चांदीच्या दागिन्यांची अधिक मागणी होती.
सोन्याचे दागिने खरेदी करताना केवळ सोनेच (Gold) नाही तर त्याच्यासोबत इतर अनेक शुल्कही (Money) भरावे लागतात. ज्यामध्ये तुम्हाला मेकिंग चार्जेस, जीएसटी आणि इतर प्रकारच्या शुल्काचा समावेश असतो.
सोन्याच्या वाढत्या भावामुळे महिलांचा अधिक कल हा आर्टिफिशयल ज्वेलरीकडे पाहायला मिळत आहे. परंतु, सोन्याचे दागिने खरेदी करताना प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. खरेदी केलेले दागिने खरे आहेत का? याशिवाय काही लोकांना सोन्याचे कॅरेट ओळखण्यात अडचण येते. जर तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक असाल ज्याला सोने खरेदी करताना 18K, 22K आणि 24K सोने बघून ओळखायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.
सोनं खरेदी करताना स्वस्त दरात मिळणारे सोने प्रत्यक्षात स्वस्त असेल म्हणजेच कमी कॅरेटचे सोने उच्च कॅरेट असल्यासारखे विकले जाते. अशावेळी त्याची योग्य माहिती घेऊन खरेदी करावे. तसेच ते शुद्ध आहे का? किती कॅरेटचे आहे हे देखील तपासावे.
२४ कॅरेटच्या सोन्यामध्ये भेसळ नसते. ते शुद्ध असल्याने दागिने बनवता येत नाही. तसेच जर 0.916 लिहिले असेल तर याचा अर्थ दागिने 22K चे आहेत. जिथे 0.833 लिहिले आहे, याचा अर्थ सोन्याची किंमत (Price) 20k आहे. तर, 0.750 म्हणजे 18k. अशा प्रकारे तुम्हाला सोने किती शुद्ध आहे हे कळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.