Smartphone ला साफ करताना या चुका अजिबात करु नका, नाहीतर फोन होईल खराब

How To Clean Smartphone : दिवसभर वापरत असणाऱ्या या स्मार्टफोनवर असंख्य घाण साचलेली असते. धुळीमुळे स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले स्पष्टपणे न दिसणे, स्पीकरमधून स्पष्ट आवाज न येणे यांसारख्या अनेक समस्यांना दिसू लागतात. त्यासाठी स्मार्टफोन वारंवार नीट साफ करणे देखील गरजेचे आहे.
How To Clean Smartphone
How To Clean SmartphoneSaam Tv
Published On

Smartphones cleaning Tips and Tricks:

आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अनेकजण स्मार्टफोनचा वापर करतात. फोन हा हे केवळ कॉल करण्यासाठीच नाही तर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी वापरला जातो.

परंतु, दिवसभर वापरत असणाऱ्या या स्मार्टफोनवर असंख्य घाण साचलेली असते. धुळीमुळे स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले स्पष्टपणे न दिसणे, स्पीकरमधून स्पष्ट आवाज न येणे यांसारख्या अनेक समस्यांना दिसू लागतात. त्यासाठी स्मार्टफोन वारंवार नीट साफ करणे देखील गरजेचे आहे.

जर तुमचा फोन (Phone) देखील घाण झाला असेल तर आम्ही तुम्हाला स्मार्टफोन स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स (Tips) सांगणार आहोत. परंतु, साफ करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोठं नुकसान सहन करावे लागू शकते. फोन कसा स्वच्छ करायचा, काय काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.

1. पाण्याचा वापर नको

स्मार्टफोन (Smartphone) साफ करताना त्याला कधीही पाण्याने स्वच्छ करुन नका. लिक्विडमुळे तुमच्या फोनचा स्पीकर आणि माइक खराब होऊ शकतो. जर तुमचा फोन आयपी रेटिंगसह येत नसेल तर तुमचा फोन खराब होईल. स्मार्टफोनची स्क्रिन कधीही टिश्यू किंवा कडक वस्तूने साफ करु नका.

How To Clean Smartphone
Jio धन धना धन ! 5G Data आणि Unlimited Calling सह वर्षभर फुकटात पाहाता येईल Disney + Hotstar; युजर्सची होणार मज्जा

2. कापड वापरा

स्मार्टफोनची स्क्रीन घाण झाली असेल तर त्यावर पाणी टाकून कोणत्याही कपड्याने आपण साफ करतो. पण या चुकीमुळे फोन खराब होऊ शकतो. स्मार्टफोनची स्क्रीन नेहमी मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ करावी. यामुळे स्क्रीनवर ओरखडे दिसत नाहीत. स्क्रीनची स्मूथनेसही टिकून राहातो.

3. स्मार्टफोनसाठी या गोष्टी वापरा

स्मार्टफोन नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी चांगला स्क्रीन गार्ड बसवणे गरजेचे आहे. यासोबतच फोनसाठी चांगले कव्हरही मिळते. खराब क्वालिटीचे कव्हर फोनसाठी चांगले नसते. यामुळे फोनमध्ये घाण साचते. स्क्रीन गार्ड आणि कव्हर असल्यामुळे स्क्रीन तुटण्याचा धोका कमी होतो.

How To Clean Smartphone
Upcoming Smartphone in January 2024: जानेवारी महिन्यात लॉन्च होणार जबरदस्त फोन, फीचर्सही मिळतील कमाल

4. टोकदार वस्तूंचा वापर नको

अनेक वेळा स्पीकर किंवा मायक्रोफोनमध्ये साचलेली घाण साफ करण्यासाठी तीक्ष्ण आणि टोकदार वस्तूंचा वापर करतो. स्पीकरसाठी कधीही टोकदार वस्तूंचा वापर करु नका. यामुळे फोन खराब होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com