Real vs Fake Nuts saam tv
लाईफस्टाईल

Real vs Fake Nuts: ड्रायफु्ट्स भेसळयुक्त आहेत हे कसं ओळखाल? पाहा अगदी साधा आणि सोपा उपाय

Real vs Fake Nuts: या दिवसात सुकामेव्याची मागणी वाढत असल्याने यामध्ये भेसळ होण्याचं प्रमाणही वाढतं. आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त सुकामेवा कसा ओळखायचा याची माहिती देणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीची तयारी आहे. उद्या धनत्रयोदशी असून लोकं खरेदीसाठी बाहेर पडली आहेत. या खरेदीमध्ये कपडे, भांडी तसंच खाण्यापिण्याच्या गोष्टींचाही समावेश असतो. दिवाळीच्या फराळासाठी लागणारे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सुकामेवा. या दिवसात सुकामेव्याची मागणी वाढत अअसल्याने यामध्ये भेसळ होण्याचं प्रमाणही वाढतं.

आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त सुकामेवा कसा ओळखायचा याची माहिती देणार आहोत. जाणून घेऊया तुम्ही याची ओळख कशी कराल?

बदाम

आहारतज्ज्ञांच्या सांगण्यांनुसार, कोणतेही ड्रायफ्रूट्स हे सुटे खरेदी करू नये. पॅक केलेले बदाम खरेदी करणे फायदेशीर असतं. बदाम उत्तम गुणवत्तेचा आहे ओळखण्यासाठी तो तळहातावर घासावा लागतो. त्यातून जर केसरी रंग निघाला तर समजा बदाम भेसळयुक्त आहे हे समजावं. वास्तविक बदाम फारसा चमकदार किंवा गडद रंगाचा नसतो. बदाम भिजवल्यानंतर पाण्याचा रंग तपकिरी झाला तर हे बदाम बनावटीचा असू शकतो.

काजू

भेसळयुक्त काजू अनेकदा वनस्पती तेलापासून बनवले जातात. या काजूंचा रंग पिवळा असेल आणि त्यात थोडे तेलही दिसून येईल. नकली काजू चघळण्याचा प्रयत्न करा, जर ते तुमच्या दातांना चिकटले तर काजू भेसळयुक्त आहेत हे समजावं.

अक्रोड

आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अक्रोडचा गर कधीही विकत घेऊ नये. आता चांगला अक्रोड ओळखण्यासाठी तुम्हाला हे पहावे लागेल की संपूर्ण कवच असलेला अक्रोड काळ्या रंगाचं नसावं. अक्रोडाचा रंग हलका तपकिरी असतो.

पिस्ता

ड्रायफ्रुट्समध्ये सर्वात महाग हे पिस्ता मानले जातात. त्यामुळे याची भेसळही जास्त प्रमाणात करण्यात येते. पिस्ता हे हिरव्या-व्हायलेट रंगाचे असतात. अनेक वेळा जुन्या आणि खराब झालेल्या पिस्त्यांना नवा रंग देऊन बाजारात विकले जातात. पिस्ता ओळखण्यासाठी तुमच्या हातावर ते घासावे लागतील यावेळी जर पिस्ता हिरवा झाला तर तो बनावट आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Tea: थकवा घालवायचाय? रोज सकाळी प्या ब्लॅक टी, शरीराला मिळतील अनेक फायदे

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबरपासून धावणार | VIDEO

Local Body Election : युती नकोच! राज ठाकरेंना काँग्रेसचा जोरदार धक्का, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Local Body Election : नगराध्यक्ष कोण? निवडणुकीच्या घोषणेआधीच भाजपची ३-३ नावे, प्रदेशाध्यक्षांकडे यादी पोहचली

SCROLL FOR NEXT