Kitchen Hacks Saam TV
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : कडक नारळाचे एका झटक्यात दोन तुकडे होतील; वाचा सिंपल ट्रिक

How to Break Coconut Easily : कठीण आणि कडक नारळ सहज फोडता येत नाही. त्यामुळे नारळ फोडण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या काही सिंपल ट्रिक्स वापरू शकता.

Ruchika Jadhav

राज्यासह संपूर्ण देशभरात लाडका गणराया विराजमान झाला आहे. बाप्पा घरी आल्याने घरात सतत गोड पदार्थ बनवले जातात. आता देखील गणरायासाठी घरात गोडधोड बनवले जात आहे. गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळे मोदकांसाठी घरात भरपूर ओले नारळ आणले जातात. गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या व्यक्ती देखील नारळ घेऊन येतात.

ओला नारळ फार कडक आणि कठीण असतो. हा नारळ फोडणे सहज शक्य नसते. नारळ फोडण्यासाठी मोठी मेहनत लागते. शिवाय काही व्यक्तींना असे नारळ फोडताना दुखापत देखील होते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी नारळ फोडण्याच्या काही सोप्प्या आणि सिंपल ट्रिक्स शोधल्या आहेत. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

पहिली ट्रिक

नारळ फोडताना सर्वात आधी त्यावर असलेल्या सर्व रेषा काढून घ्या. रेषा काढून झाल्यानंतरच तुम्ही नारळ फोडू शकता. हाताने या सर्व रेषा काढून टाका.

नारळाच्या रेषा काढल्यावर तो तोडणे सहज शक्य होतं. त्यानंतर हा नारळ जमिनीवर जोरात आपटून घ्या.

नारळ जमिनीवर आदळताना त्याला व्यवस्थीत मध्यभागी मार लागणे गरजेचं आहे. नारळाला मध्यभागी मार लागला नाही आणि अन्य ठिकाणी नारळ फुटला तर त्यातून खोबरं बाहेर काढणं कठीण होतं.

अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी नारळावर फटका बसला की त्यातून खोबरं देखील सजह बाहेर काढता येतं.

दुसरी ट्रिक

नारळ तोडताना तु्म्हाला वरील ट्रिक तितकी सोपी वाटत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी आणखी एक ट्रिक शोधली आहे.

यासाठी तुम्हाला आधी नारळाच्या रेषा काढून घ्यायच्या आहेत.

त्यानंतर गॅसची मिडिअम फ्लेम ठेवून नारळ गॅसवर ठेवायचा आहे.

नारळ गरम झाल्याने तो फोडण्यासाठी जास्त काठीण जात नाही.

नारळ फोडताना तुम्ही यासाठी लाटण्याचा वापर सुद्धा करू शकता. नारळ गरम केल्याने तो सहज फुटतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT