Monsoon Kitchen Hacks to a Bug-Free Home Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Kitchen Hacks To A Bug-Free Home : पावसाळ्यात घरातले किडे पळवण्यासाठी किचनमधल्या या गोष्टीचा करा वापर

Tips for a Bug-Free Kitchen : हाळ्यानंतर पाऊस पडला की जमिनीत लपलेले सर्व किडे त्यातून बाहेर येऊ लागतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Monsoon Kitchen Hacks : हाळ्यानंतर पाऊस पडला की जमिनीत लपलेले सर्व किडे त्यातून बाहेर येऊ लागतात. त्यामुळे घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी फक्त दरवाजे आणि खिडक्या बंद करणे पुरेसे नाही.

हे कीटक चावल्याने संसर्ग खूप वेगाने पसरतात. म्हणूनच असे काही उपाय ताबडतोब करणे आवश्यक आहे, ज्यामुळे ते दूर करात येतील. अशा वेळी जर तुम्हालाही पावसाळी कीटकांचा त्रास होत असेल तर येथे सांगितलेले उपाय त्वरित करून पहा.

झुरळे दूर करण्यासाठी हळदीचा अशा प्रकारे वापर करा

घरातील झुरळांना लांब ठेवण्यासाठी तुम्ही हळदीचा (Turmeric) वापर करू शकता. यासाठी 2 चमचे हळद, 1 कप कडुलिंबाचे तेल आणि 5 चमचे लिंबाचा रस काही कोमट पाण्यात चांगले मिसळा. आता हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी जिथून झुरळ बाहेर पडत असतील त्या ठिकाणी फवारणी करा. 2-3 दिवस सतत वापरल्यानंतर तुम्हाला घरात एक झुरळ दिसणार नाही.

हळदीने घरातील सर्व मुंग्या दूर करा

पावसाळ्याच्या दिवसात मुंग्या खूप येतात. अशा वेळी यापासून सुटका मिळवण्यासाठी हळदीमध्ये सम प्रमाणात मीठ मिसळून मुंग्यां जिथे असतात तेथे शिंपडा. यामुळे मुंग्या एका मिनिटात त्या ठिकाणाहून गायब होतात.

लहान कीटकांना मारण्यासाठी हे उपाय करा

पावसाळ्याच्या दिवसात घरात (Home) दिसणारे छोटे कीटक दूर करण्यासाठी तुम्ही लवंग पावडर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता किंवा कापूर जळत ठेवू शकता. असे मानले जाते की कीटक त्याचा तीव्र वास सहन करू शकत नाहीत आणि लगेच मरतात.

पावसाळी कीटकांना अशा प्रकारे घरापासून दूर ठेवा

पावसाळ्यात घराला कीटक व कीटकांपासून मुक्त ठेवायचे असेल तर स्वच्छतेकडे (Clean) अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत, दररोज डस्टबिन रिकामे करण्यापासून ते झाडून काढणे आणि मॉपिंग करणे खूप महत्वाचे आहे. तसेच, मॉपिंग वॉटरमध्ये व्हिनेगर घालण्यास विसरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच राजकारण तापलं, स्वबळाचा नारा, उदय सामंतांचा मित्रपक्षाला इशारा

Diwali Abhyang Snan Positivity: अभ्यंगस्नान करताना अंघोळीच्या पाण्यात टाका या वस्तू, शरीरात दिसतील चांगले बदल

SCROLL FOR NEXT