UPI Payment Saam Tv
लाईफस्टाईल

UPI Payment : बँक खाते रिकामे असल्यास पेमेंटचे टेन्शन नाही! UPI देणार कर्ज, कसं? वाचा सविस्तर

Shraddha Thik

Online Payment :

तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की तुम्हाला एखादे महत्त्वाचे पेमेंट करावे लागेल आणि खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नाही. अशा स्थितीत तुमचे काम होणे शक्य नाही. पण आता तसे होणार नाही कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आता UPI वापरकर्त्यांसाठी क्रेडिट लाइन सेवा ऑफर करण्यास मान्यता दिली आहे, म्हणजेच आता तुमच्या बँकेत शून्य रक्कम शिल्लक असतानाही तुम्ही पेमेंट करू शकता.

RBI ने UPI मध्ये 'Pay Later' सेवा जोडण्यासाठी बँकांना मंजुरी दिली आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या पूर्व-मंजूर क्रेडिट मर्यादेसह पेमेंट (Payment) करण्यात मदत करण्यासाठी काही बँकांनी 'Pay Later' पर्याय सुरू केला आहे. ते कसे काम करते आणि कोणत्या प्रकारचे शुल्क भरावे लागते ते पाहूयात.

UPI Pay Later काय आहे?

अलीकडेच RBI ने UPI मध्ये 'Pay Later' सेवा जोडण्यासाठी बँकांना मंजुरी दिली आहे. यामध्ये आता युजर्सचे बँक खाते रिकामे असले तरीही पेमेंट करता येणार आहे. हा पर्याय 'Buy Now Pay Later' सारखाच आहे. आतापर्यंत, UPI वापरणारे वापरकर्ते फक्त त्यांचे बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) UPI शी लिंक करू शकत होते, परंतु आता UPI व्यवहारांसाठी क्रेडिट लाइन मर्यादा वापरली जाऊ शकते. ही सेवा जवळपास प्रत्येक UPI ऍप्लिकेशनवर उपलब्ध असेल.

UPI Pay Later कसे काम करेल?

सर्वप्रथम, बँकांना क्रेडिट लाइनसाठी ग्राहकांकडून मंजुरी घ्यावी लागेल आणि त्यानंतर क्रेडिट मर्यादा निश्चित केली जाईल. वापरकर्ते त्यांच्या UPI अॅप्सवर 'Pay Later' पर्याय सक्रिय करू शकतात. पेमेंट केल्यानंतर, बँक (Bank) तुम्हाला ते परत करण्यासाठी वेळ देखील देते आणि त्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

सध्या HDFC आणि ICICI बँकांनी UPI Now Pay Later सेवा सुरू केली आहे. खातेदाराच्या पात्रतेनुसार दोन्ही बँकांनी कमाल क्रेडिट मर्यादा रु. 50,000 ठेवली आहे. आरबीआयने इतर सर्व बँकांना ही सुविधा UPI सोबत जोडण्यास सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT