UPI Payment :घाबरु नका! UPI पेमेंट करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झालेत? यापद्धतीने मिळवू शकतात पैसे परत
Wrong UPI Payment
सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. पैसे पाठवण्यासाठीही आपण ऑनलाईन पेमेंटचा वापर करतो. ऑनलाईन बँकिंगमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. UPI पेमेंटमुळे आपण एक क्यूआर कोड स्कॅन करुन पैसे पाठवू शकतो. परंतु ऑनलाईन पेमेंट करताना जर दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले तर अनेक अडचणी येऊ शकतात. असं तुमच्याही बाबतीत झाले झाले असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.
ऑनलाईन पेमेंट करताना खूप काळजी घ्यायची असते. जर पेमेंट करताना एखादा नंबर चुकीचा टाकला तर त्याने पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा होतील. पैसे पाठवताना जर आकडा चुकला तर जास्त रक्कम जाऊ शकते. जर तुम्ही पेमेंट करताना काही चुक झाली तर या गोष्टीची तक्रार करु शकता.
जर चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले तर
जर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात जमा झाले तर तुम्ही तक्रार करु शकता. तुम्ही Gpay, PhonePe, Paytm यांसारख्या अॅपवरुन पेमेंट केले असेल तर अॅपमध्ये असलेल्या ग्राहक सेवा सेंटरवर मदत मागू शकता. सर्वात आधी तुम्ही तुमच्या बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर फोन करुन घडलेला प्रकार सांगू शकता. तुमच्या फोनमधून पैसे गेल्याचा मेसेज सेव्ह करा. पैसे रिफंड मिळवताना हा मेसेज दाखवणे गरजेचे आहे.
आरबीआयच्या सूचना
आरबीआयने यांसदर्भात सूचना जारी केल्या आहेत. जर चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले असेल तर Bankingombudsman.rbi.org.in वर जाऊन तक्रार दाखल करु शकता. जर चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर बँकेत यासंदर्भात अर्ज करावा लागेल. यात तुम्हाला बँकेचे सर्व डिटेल्स द्यावे लागेल. त्याचबरोबर ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत त्याचा नंबर टाकावा लागेल. तसेच कायदेशीर तक्रार करता येते.
जर तुम्हाला चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेला व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहित असेल आणि तो व्यक्ती पैसे देण्यास नकार देत असेल तर त्याविरोधात तुम्ही NPCI च्या वेबसाइटवर तक्रार दाखल करु शकता.
NPCI वेबसाइटवर तक्रार कशी करावी
सर्वप्रथम NPCI वेबसाइटवर भेट द्या.
तिथे Dispute Redressal Mechanism वर क्लिक करा.
तिथे टान्झॅक्शन टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा.
तसेच तसेच व्यवहार कोणत्या प्रकारचा केला आहे, समस्या, व्यवहाराची तारीख, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तक्रार नोंदवली जाईल.
तुमच्या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती ई-मेलवर प्राप्त होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.