Liver disease 
लाईफस्टाईल

Fatty Liver: फॅटी लिव्हरची सुरुवातीची 5 लक्षणे कोणती? घरबसल्या करता येईल तपासणी; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Fatty Liver Symptoms: फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे ओळखून घरी तपासणी करता येते. थकवा, पोट दुखणे, त्वचा बदल, भूक न लागणे यावर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

फॅटी लिव्हरच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात फॅट जमा झाल्याने हा आजार निर्माण होतो. यामुळे लिव्हरवर सुज आणि ताण येऊन गंभीर नुकसान होऊ शकतं. तज्ज्ञांच्या मते, फॅटी लिव्हरच्या तपासण्यासाठी मोठमोठ्या चाचण्यांची गरज नसते. सुरुवातीच्या काही लक्षणांवरून आपण घरीच याचा अंदाज घेऊ शकतो. पुढे अगदी सोप्या पद्धतीने ही लक्षणे जाणून घ्या.

१. पोटावर वाढलेली चरबी

पोटाभोवती वाढलेली चरबी ही फॅटी लिव्हरची महत्त्वाची लक्षणं मानली जातात. विशेषत: व्हिसरल फॅट म्हणजेच आतड्याभोवती साचलेली चरबी ही शरीरात इन्सुलिन रेसिस्टन्स निर्माण होऊन लिव्हरमध्ये फॅम जमा होण्याचा धोका वाढवत असते.

२. पोटात सतत दुखणे

पोटात वारंवार stiffness, tenderness किंवा जेवणानंतर दाब जाणवणं, ही फॅटी लिव्हरची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. लिव्हर मोठा झाल्यामुळे तो पोटावर ताण निर्माण करतो, ज्यामुळे सतत discomfort जाणवतो.

३. भूक न लागणे आणि मळमळ

जर सतत भूक लागत नसेल, खाण्याची इच्छा होत नसेल आणि वारंवार मळमळ होत असेल, तर हे देखील फॅटी लिव्हरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. यावेळी लिव्हर चरबीमुळे नीट कार्य करत नसतो.

४. त्वचा व केसांमधील बदल

मानेवर किंवा काखेत काळसर डाग (Acanthosis Nigricans) दिसणे, केस गळणे किंवा त्वचेवर खाज येणे, हे लिव्हर खराब होण्याचे लक्षण असू शकते. लिव्हर नीट कार्य न केल्याने शरीरात टॉक्सिन्स वाढतात व पित्तनिर्मिती बिघडते.

५. थकवा आणि दमल्यासारखे वाटणे

फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांना सतत थकवा जाणवतो. पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊनही शरीराला ऊर्जा मिळत नाही. कारण, लिव्हर हेच शरीराचे ‘एनर्जी सेंटर’ असते आणि ते नीट काम न केल्यास शरीरात थकवा वाढतो. फॅटी लिव्हर हा आजार सुरुवातीला ओळखला तर त्यावर नियंत्रण ठेवता येते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, मद्यपान टाळणे आणि पुरेशी झोप घेतल्यास लिव्हर निरोगी राहते. डॉक्टरांच्या मते, हे लक्षणे दिसल्यास वेळ न दवडता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT