high blood pressure  google
लाईफस्टाईल

High Blood Pressure: हे ५ ज्यूस BP ठेवतील नियंत्रणात अन् हार्ट राहील हेल्दी

Heart Health: उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी लिंबूपाणी, जास्वंद चहा, ग्रीन टी, बीट आणि डाळिंबाचा रस फायदेशीर ठरतो. हे पेय हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Sakshi Sunil Jadhav

उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर ही समस्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला असतेच. जर ब्लड प्रेशर वेळेवर नियंत्रणात ठेवलं नाही तर तुम्हाला हृदयविकार, स्ट्रोकसारखे जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. याचं कारण तुमच्या रोजच्या सवयीच आहेत. जसं की, एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करून स्ट्रेस घेणं, जेवणात मीठाचं प्रमाण वाढवणं, लठ्ठपणा, मद्यपान किंवा धूम्रपान करणं. या सवयींमुळे रक्तदाब वाढतो असं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवायचा असेल तर औषधांसोबतच नैसर्गिक उपायही करून शकता. त्यासाठी रोजच्या आहारात काही पेयांचा (ड्रिंक्सचा) समावेश करावा लागेल. त्याने रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे व्यवस्थित काम करू लागतं. सकाळी उपाशीपोटी कोमट लिंबूपाणी सेवन करा. याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरात असणारे विषारी घटक बाहेर पडतात. लिंबूपाण्यामुळे रक्तवाहिन्या सैल होतात, ज्याचा थेट फायदा हृदय सुरळीत काम करण्यावर होतो.

दुसरा उपाय म्हणजे जास्वंदाची चहा रोज पिणं. आयुर्वेदात या चहाला खूप महत्व आहे. रोजच्या रोज या चहाचं सेवन केल्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाब कमी होतो, असं अनेक अभ्यासांतून समोर आलं आहे. त्याचप्रमाणे ग्रीन टी सुद्धा रक्तदाबासाठी फायदेशीर मानली जाते. कारण ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन्स रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारतात आणि उच्च रक्तदाब नॅचरली कमी होतो.

बीटाचा रस हा सुद्धा रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. बीटामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात जाऊन नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात. याने रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब कमी होण्यास सुरुवात होते. तसेच डाळिंबाचा रसही हृदयासाठी फायदेशीर मानला जातो.

कारण डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स मुबलक प्रमाणात असतात. यांचं काम म्हणजे ते उच्च रक्तदाब नियंत्रित करायला खूप मदत करातात. रोज डाळिंबाचा रस सेवन केल्यानं रक्तदाबात मोठ्या सुधारणा होऊ शकते असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surupsingh Naik Passes Away: आदिवासी युवकांचा आधारस्तंभ हरपला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणी, नगराध्यक्ष ते आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या; ऐन निवडणुकीत राज्य सरकारचे ४ महत्वाचे निर्णय

Urfi Javed: रात्री ३ वाजता दोन पुरुषांनी दार ठोठावलं अन्...; उर्फी जावेदसोबत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: जळगावात 'राज-उद्धव' युतीचा धमाका; उबाठा आणि मनसे कार्यकर्ते एकत्र

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

SCROLL FOR NEXT