Diabetes Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes असणाऱ्यांनो, लगेच होईल Blood Sugar कमी; या मसाल्यांचे करा सेवन

Diabetes Health Tips : आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत ज्याचे सेवन केल्याने चयापचय गतिमान करते. ते इन्सुलिन पेशींच्या क्रियाकलापांना गती देते. ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहातो. जाणून घेऊया यावर मात कशी करता येईल.

कोमल दामुद्रे

How To Control Blood Sugar :

मधुमेहाच्या आजाराने तरुणांपासून वयोवृद्धातील अनेक लोक त्रस्त आहेत. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, तणाव आणि अपुरी झोप यामुळे मधुमेहाच्या आजाराला सामोरे जावे लागते.

या आजारात शरीरातील साखर नियंत्रणात ठेवणे कठीण होते. त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. अशावेळी काही घरगुती उपायांचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत ज्याचे सेवन केल्याने चयापचय गतिमान करते. ते इन्सुलिन पेशींच्या क्रियाकलापांना गती देते. ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहातो. जाणून घेऊया यावर मात कशी करता येईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. हळदी बहुगुणी ठरेल

हळदीतील (Turmeric) कर्क्युमिन हे दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंए एजंट म्हणून काम करते. यामुळे साखर (Sugar) नियंत्रित राहाण्यास मदत होते. याच्या सेवनाने शरीरातील जळजळ कमी होऊन चयापचय सुधारण्यास मदत होते. तसेच ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते ज्यामुळे सूक्ष्म रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळता येते.

2. सकाळी प्या हळदीचे पाणी

तुमची शुगर लेव्हल नेहमीच जास्त असेल तर सर्वात आधी हळदीचे पाणी प्या. यासाठी हळदी बारीक करुन पाण्यात मिसळा आणि हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे चयापचय गती सुधारण्यास मदत होईल.

3. तुपामध्ये हळद मिसळून खा

तुपामध्ये हळद मिसळून खाल्ल्याने साखरेचे चयापचय जलद होण्यास मदत होते. ज्याचा थेट इन्सुलिन वाढवते आणि साखर पचनाचा वेग वाढवते. तुपात मिसळून हळद खाल्ल्याने त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. हा उपाय आठवड्यातून ३ वेळा केल्याने मधुमेह (Diabetes) नियंत्रणात राहाण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT