Beauty Parlor Stroke Syndrome : ब्युटी पार्लरमध्ये केस धुणे पडू शकते महागात, ही लक्षणे दिसल्यास त्वरीत घ्या डॉक्टरांचा सल्ला

Beauty Parlor Stroke Syndrome Causes : पार्लरमध्ये केस धुतल्यामुळे तुम्हाला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम होऊ शकतो. हा सिंड्रोम नेमका काय आहे? याची लक्षणे कोणती? जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
Beauty Parlor Stroke Syndrome
Beauty Parlor Stroke SyndromeSaam Tv
Published On

Beauty Parlor Stroke Syndrome Symptoms :

सुंदर दिसणे कुणाला आवडत नाही. आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य हे केसांवर अवलंबून असते. केस सुंदर दिसावे यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील करतो. तसेच हेअर मास्क लावणे, तेल लावणे यांसारख्या गोष्टी आपण करतो.

बरेचदा केस आणखी सुंदर दिसण्यासाठी आपण ब्युटी पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन हेअर ट्रिटमेंट घेतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. पार्लरमध्ये केस धुतल्यामुळे तुम्हाला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम होऊ शकतो. हा सिंड्रोम नेमका काय आहे? याची लक्षणे कोणती? जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम म्हणजे काय?

शाम्पू किंवा केस (Hair) धुण्यासाठी ब्युटी पार्लरमधील सिंकवर मान ठेवल्याने ते जास्त ताणले जाऊ शकते. त्यामुळे मानेच्या नसा संकुचित होऊ लागतात. यामुळे ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमचा धोका होऊ शकतो. मेंदूपर्यंत रक्त योग्य प्रकारे पोहोचत नसल्यामुळे असे होते. केस धुताना मान एका सिंकावर ठेवली जाते, ज्यामुळे केस धुता येतात. या सिंकवर मानेच्या नसा संकुचित होतात. त्यामुळे मेंदूपर्यंत रक्त पोहोचण्यास अडचण येते ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.

Beauty Parlor Stroke Syndrome
Diabetes मुळे होऊ शकतो Kidney वर परिणाम, वेळीच घ्या काळजी; अन्यथा...

2. लक्षणे (Symptoms) कोणती?

  • केस धुतल्यानंतर किंवा लगेचच डोकेदुखी सुरू होते

  • चक्कर येणे

  • शरीराच्या कोणत्याही भागात सुन्नपणा

  • मेंदूमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याने अशक्तपणा जाणवतो.

  • धूसर दृष्टी

यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामध्ये हृदयविकार, मधुमेह (diabetes), उच्च रक्तदाब किंवा यापूर्वी स्ट्रोक येऊ गेलेल्या लोकांना याचा धोका जास्त असतो.

3. काळजी कशी घ्याल?

  • केस धुताना आपली मान जास्त ओढू नका. मानेच्या ताणामुळे मज्जातंतूवर परिणाम होतो.

  • मानेच्या खाली आधार नसल्यामुळे रक्तवाहिन्यांना त्रास होतो. त्यामुळे केस धुताना मानेमध्ये काही अडचण आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com