Diabetes Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Tips : मधुमेहापासून किडनीच्या विकारांवर फायदेशीर आहे आंब्याची पाने, या पद्धतीने करा सेवन

How To Control Blood Sugar : मधुमेहाच्या आजारांने जगभरात अनेक लोक त्रस्त आहेत. यामध्ये शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात न राहिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.

कोमल दामुद्रे

Mango Leaves Benefits :

मधुमेहाच्या आजारांने जगभरात अनेक लोक त्रस्त आहेत. यामध्ये शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात न राहिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.

उन्हाळा म्हटलं की, आपल्याला सर्वत्र आंबे पाहायला मिळतात. आरोग्यासाठी आंबे हे अधिक गुणकारी आहे. परंतु, आंबेच नाही तर त्याच्या पानांचा देखील आरोग्यासाठी फायदा होतो. आयुर्वेदात आंब्याच्या पानांना अधिक महत्त्व आहे. याचे सेवन केल्याने अनेक आजारांवर मात करता येते. जाणून घेऊया आंब्याची पाने कोणत्या आजारावर (Disease) बहुगुणी ठरतात.

1. मधुमेह

मधुमेहाचा (Diabetes) त्रास असलेल्या लोकांसाठी आंब्याच्या पानांचे पाणी खूप फायदेशीर आहे. यासाठी पाने पाण्यात उकळून रात्रभर ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामध्ये अँथोसायनिन नावाच्या टॅनिनच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

2. दमा

जर तुम्हाला दमा किंवा श्वसनाचा त्रास असेल त्यावर आंब्याची पाने बहुगुणी आहेत. याचे डेकोक्शन तयार करुन प्यायल्याने या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच फ्लू आणि घसा खवखवण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

3. किडनी स्टोन

किडनी (Kidney) स्टोनची समस्या उद्भवली असेल तर आंब्याची पाने खूप प्रभावी ठरतात. यासाठी आंब्याची पाने उन्हात सुकवून त्याची पावडर बनवावी. तयार पावडर रात्रभर पाण्यात टाकावी. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे त्याने फायदा होतो.

4. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

बदलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक वयोगटातील लोक त्रस्त आहेत. अशावेळी आंब्याच्या पानांचे सेवन फायदेशीर ठरेल. यामध्ये असलेले घटक मेटाबॉलिक सिंड्रोममध्येही खूप प्रभावी ठरु शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT