Amla Benefits, How To Control Blood Sugar Saam Tv
लाईफस्टाईल

Amla Benefits : मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरेल आवळा, या ५ पद्धतीने करा सेवन

How To Control Blood Sugar : भारतामध्ये मधुमेहाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत आहे. मधुमेहाचा आजार हा आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे जडतो. बदलेली जीवनशैली, अपुरी झोप, सततची चिंता यामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो.

कोमल दामुद्रे

Diabetes Health :

भारतामध्ये मधुमेहाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत आहे. मधुमेहाचा आजार हा आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे जडतो. बदलेली जीवनशैली, अपुरी झोप, सततची चिंता यामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो.

मधुमेह हा एक असा आजार आहे व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिनचा योग्य वापर होत नाही. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेहाच्या (Diabetes) आजारावर (Disease) आवळा हे गुणकारी फळ मानले जाते. जे व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट, फॉस्फरस, कार्ब्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर (Benefits) ठरु शकते.

आवळा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया याचे सेवन कसे करायचे

1. आवळा पावडर

आवळा सुकवून त्याची पावडर तयार करा. ही पावडर तुम्ही स्मूदी, दही किंवा दलियामध्ये मिसळून खा. यात असणारे पौष्टिक घटक आरोग्याला अधिक फायदेशीर आहे.

2. आवळ्याचा रस

आवळ्याच्या रसात हलके काळे मीठ मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने फायदेशीर ठरते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

3. आवळ्याचे लोणचे

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळ्याच्या लोणच्याचे नियमित सेवन करु शकता. जेवणाची चव वाढवण्यासोबत साखरेची पातळी राखण्यास मदत होते.

4. आवळा चटणी

जर तुम्हाला चटणी आवडत असेल तर तुम्ही आवळ्याची चटणी खाऊ शकता. आवळा पचनासाठी अधिक फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना आराम मिळतो.

5. आवळा कोशिंबीर

किसलेला आवळा, गाजर, बीटरुट, काकडी, मुळा, आले आणि काही हिरव्या पालेभाज्या मिसळून सॅलड तयार करा. ज्यामुळे जेवणाची चव वाढते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT