Diabetes Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Tips : रक्तातील साखर राहिल नियंत्रणात! रात्री झोपण्यापूर्वी करा हे ४ काम

Before Bed Routines for Diabetic People : जर तुम्हालाही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी या ४ गोष्टी लक्षात ठेवा

कोमल दामुद्रे

How To Control Blood Sugar :

बसून काम करण्याची पद्धत, कमी झोप आणि अधिकच्या ताणामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. सततचा ताण घेतल्याने अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. त्यातील एक मधुमेह.

मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करतो. यामध्ये शरीरातील रक्ताची पातळी झपाट्याने वाढू लागते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात न राहिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. जर तुम्हालाही रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी या ४ गोष्टी लक्षात ठेवा

1. खाल्ल्यानंतर शारीरिक हालचाल करा

रात्रीच्या जेवणानंतर (Food) अंथरुणावर लगेच झोपू नका. या वाईट सवयींमुळे सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे जेवल्यानंतर अर्धा किंवा तासभर शारीरिक हालचाल करा.

2. योगासने

योग हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. रात्री जेवल्यानंतर नियमितपणे वज्रासन केल्याने मधुमेह नियंत्रित राहाण्यास मदत होते.

3. गोडाचे पदार्थ खाणे टाळा

रात्री झोपण्याच्या वेळी गोड पदार्थ खाणे टाळा. जर तुम्हाला रात्री जेवल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

4. झोप

रात्री जेवल्यानंतर १ तासाने किमान २ ग्लास पाणी प्या. असे केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल. याशिवाय मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. तसेच रात्री मोबाइल स्क्रीनपासून दूर राहा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT