High Blood Pressure  saam tv
लाईफस्टाईल

High Blood Pressure: ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी हाताचे 'हे' पॉइंट करा प्रेस, फक्त १० मिनिटांत मिळेल आराम

Lower BP Treatment: सध्याच्या लाइफस्टाईलमुळे अनेक आजार आता कॉमन झाले आहेत. ब्लड प्रेशर हा आजार सुद्धा त्यापैकीच एक आहे. मागील काही वर्षात ब्लड प्रेशरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना आपल्याला दिसतच असेल.

Saam Tv

सध्याच्या लाइफस्टाईलमुळे अनेक आजार आता कॉमन झाले आहेत. ब्लड प्रेशर हा आजार सुद्धा त्यापैकीच एक आहे. मागील काही वर्षात ब्लड प्रेशरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना आपल्याला दिसतच असेल. त्यात कोणाला ब्लड प्रेशरची समस्या आहे तर कोणाला हाय बिपीचा त्रास आहे. या दोन्ही समस्या आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक असतात. त्यासाठी आपण योग्य आहार, पाणी, व्यायाम आणि एकूणच निरोगी जीवनशैली पाळणे आवश्यक आहे.

ब्लड प्रेशर ही समस्या आता वाढत चालली आहे. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी काही अ‍ॅक्युप्रेशरच्या मदतीने रक्तदाब नियंत्रणात आणू शकता. अ‍ॅक्युप्रेशरमध्ये, शरीराच्या काही विशिष्ट बिंदूंवर दबाव टाकला जातो. त्याने आरोग्याची स्थिती सुधारते. आज आम्ही तुम्हाला रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी असे काही अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्स सांगणार आहोत ते पुढील प्रमाणे असतील.

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्स

1. डाव्या हाताचा अंगठा

तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावरील अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट दाबू शकता. हा बिंदू अंगठ्याच्या शेवटच्या भागाच्या बाजूला आहे. दररोज दहा मिनिटे दाबून ठेवल्याने तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रित करता येतो.

2. पायाच्या दोन्ही बोटांमधला भाग

ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही LV3 या नावाच्या अ‍ॅक्युप्रेशर पॉइंटवर प्रेस करू शकता. हा पॉइंट पायाच्या अंगठ्याच्या दोन्ही बोटांमधला भाग असते. त्यावर थोडा वेळ प्रेस केल्याने तुम्हाला त्वरित फरक जाणवू शकतो.

3. LI 4 या पॉइंटला प्रेस करा

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही LI 4 या पॉइंटला प्रेस करू शकता. प्रेस करून थोडा वेळ तसेच ठेवल्याने तुम्हाला फरक जाणवेल. त्याने तुम्हाला इम्यूनिटी बूस्ट करण्यास मदत मिळू शकते. तसेच आजारांचा धोका सुद्धा टळू शकतो.

4. पॉइंट P8 प्रेस करा

ज्या व्यक्तींचा ब्लड प्रेशर लो होत असतो त्यांनी पॉइंट पी ८ म्हणजेच अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट प्रेस करावा. या बिंदूवर थोडासा हलका दाब दिल्यास कमी रक्तदाबात खूप आराम मिळू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT