Home Cleaning Hacks Saam tv
लाईफस्टाईल

Home Cleaning Hacks : दहा रुपयांत चमकवा तुमच्या घरातले घाणरेडे, पिवळे पडलेले बाथरुम, स्वच्छ करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Cleaning Hacks : खरेतर बाथरुमची साफसफाई करताना घराच्या गृहिणीच्या नाकी नऊ येतात. सगळं ट्राय केल तरी टाइल्स व बाथरुममधील पिवळेपणा कमी होत नाही

कोमल दामुद्रे

How To Clean Bathroom Tiles and Pot : घरातील सगळ्यात घाणेरडा भाग कोणता असेल तर ते बाथरुम. बाथरुम हा सगळ्यात अस्वच्छतेचा भाग आहे. ते साफ करताना बरेचदा अधिक मेहनत करावी. सततच्या ओलव्यामुळे ते चिकट राहाते, त्याच्या टाइल्सही पिवळ्या पडतात.

खरेतर बाथरुमची साफसफाई (Cleaning) करताना घराच्या गृहिणीच्या नाकी नऊ येतात. सगळं ट्राय केल तरी टाइल्स व बाथरुममधील पिवळेपणा कमी होत नाही. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांना बाथरुममध्ये जाऊ द्यायचं की नाही हा प्रश्न सतत पडत असतो. पण आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स (Tricks) सांगणार आहोत ज्यामुळे फक्त १० रुपयांत तुमचे टेन्शन कमी होईल.

1. बाथरूमच्या फरशा कशा स्वच्छ करायच्या

फरशी साफ करण्यासाठी लिंबाची (Lemon) साल उपयुक्त ठरेल. मीठ व कोरड्या लिंबाची साल एकत्र करा त्यात दोन ते तीन चमचे हरपिक टाका. हे मिश्रण लावण्यापूर्वी तुम्ही हातमोजे घाला. आता मिश्रणात थोडे पाणी घालून बाथरूमच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरवा. हे मिश्रण घाणेरड्या भांड्यातही टाकता येते. बाथरूममध्ये किमान 30-35 मिनिटे राहू द्या आणि नंतर थोडे पाणी घालून स्क्रबरने घासून घ्या. फरशा चमकण्यास मदत होईल

2. डिस्प्रिन

पाण्यात विरघळणारी औषधे जसे की ऍस्पिरिन किंवा डिस्प्रिन बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरली जाऊ शकतात . तुम्हाला फक्त सॅलिसिलिक अॅसिड असलेली कोणतीही टॅब्लेट पाण्यात विरघळवावी लागेल आणि थोडा वेळ टाइल्सवर ठेवावी लागेल. त्यानंतर नॉर्मल फिनाईल किंवा कोणत्याही प्रकारचे टॉयलेट क्लीनर टाका साधारणपणे 20 मिनिटांनी स्क्रब करा. ही पद्धत तुमच्या टाइल्सवरील मीठ पाण्याचे डाग सहजपणे काढून टाकेल.

3. टॉललेट पॉट

जर तुमच्या घरी पांढरे व्हिनेगर असेल तर ते टॉयलेट पॉटमध्ये ओता आणि 1 तास तसेच ठेवा. या गोष्टी घरात नसलीत तर पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा आणि भांड्याच्या डागावर लावा आणि किमान 2 तास राहू द्या. हवे असल्यास तुम्ही या पेस्टमध्ये हरपिक टाकू शकता. यानंतर तुम्हाला नॉर्मल स्क्रब करावे लागेल.

4. साहित्य-

2 चमचे बोरॅक्स पावडर

2 चमचे डिश वॉश द्रव

2 चमचे पांढरे व्हिनेगर

आवश्यकतेनुसार पाणी

या सगळ्यांची पेस्ट तयार करुन ती टॉयलेट पॉटच्या त्या डागांवर लावावी लागेल जे सहज साफ होत नाहीत. 30 मिनिटांनंतर थोड्या पाण्याने स्क्रब करा. यामुळे हट्टी डाग नाहीसे होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT