Fashion tips in marathi
Fashion tips in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

सावळ्या रंगाच्या मुलींनी हे कपडे लग्नात परिधान करा !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळा म्हटलं की, लग्नसराईचा (Wedding) हंगाम सुरु असतो. अशावेळी आपण त्वचेच्या रंगानुसार, शरीरानुसार कोणते कपडे परिधान करायला हवे हा प्रश्न सतत पडत असतो. प्रत्येकाच्या त्वचेच्या रंगानुसार त्याला ओळखले जाते परंतु, डस्की किंवा गव्हाळ त्वचा असलेल्या मुली खूप आकर्षक दिसतात. गडद त्वचा (Skin) असणाऱ्या मुली अनेकदा आपल्या कपड्यांबद्दल गोंधळलेल्या असतात. जर आपल्या त्वचेचा रंग धुसर असेल आणि त्यासाठी आपल्याला स्वतःसाठी लेहेंगा निवडायचा असेल तर ही माहिती उपयुक्त ठरू शकतो.

हे देखील पहा -

या रंगाचे कपडे सावळ्या रंगाच्या मुलींनी परिधान करा.

१. केशरी रंगाचा लेहेंगा -

केशीर रंगाचा लेहेंगा डस्की स्किन टोन असणाऱ्या मुलांनी अधिक सुंदर व स्टाइलिश दिसतो. या रंगांचा लेहेंगा आपल्यासाठी उत्तम पर्याय असेल. हा रंग आपल्या स्किन टोनला चांगली दिसेल त्यासोबतच आपण केशरी रंगाच्या लेहेंग्यासोबत सोनेरी आणि हिरव्या रंगाचे पारंपरिक दागिने घालू शकतो. याशिवाय, आपण यावर ऑक्सिडाइज्डचे दागिने देखील घालू शकतो. मरून कलरचे ब्लाउज आपण ऑरेंज कलरच्या लेहेंग्यासोबत घालू शकतो. हे कॉम्बिनेशन खूप स्टायलिश दिसेल.

२. एँक्वा रंगांचा लेहेंगा -

एँक्वा रंगांचा लेहेंगा अतिशय हलका आणि सुंदर लुक देतो. लग्नासाठी आपण या रंगाचा लेहेंगा निवडू शकतो, हा रंग खूप ट्रेंडमध्ये आहे. यावर आपण गोल्डन किंवा सिल्व्हर या दोन्ही रंगाचे दागिने एँक्वा रंगांच्या लेहेंग्यासह खूप स्टायलिश दिसतात. तसेच यासोबत काळ्या रंगाचा किंवा सिल्व्हर कलरचा ब्लाउज आपण निवडू शकतो.

३. मोरपिसी निळा रंगांचा लेहेंगा -

गडद रंगाचे लेहेंगा सावळ्या त्वचेच्या स्त्रियांना चांगले दिसत नाहीत हा मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. आपण मोरपिसी निळा रंगांचा लेहेंगा देखील एक चांगला पर्याय आहे. या रंगाचा लेहेंगा आपण लग्नात किंवा वेगवेगळ्या सणांमध्येही (Festival) स्टाइल करू शकता. पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे ब्लाउज या निळ्या रंगाच्या शेडसोबत जोडता येऊ शकते. याशिवाय, आपण केशरी आणि पिवळ्या रंगाचा दुपट्टा देखील यावर स्टाईल म्हणून घेऊ शकतो.

लग्नात या रंगाचे कपडे आपण परिधान करु शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT