Sim Card  Saam Tv
लाईफस्टाईल

Sim Card : तुमच्या नावाने कोणी सीम कार्ड वापरतंय का? 'या' वेबसाईटच्या माध्यमातून १ मिनिटात ओळखा

How Many SIM on Aadhar Card News : एक जुलैपासून हा नवीन नियम लागू होणार आहे. तसेच तुमच्या नावाने कोणी सीमकार्ड वापरत आहेत का, याबाबतची माहिती एका मिनिटात उपलब्ध होऊ शकते.

Vishal Gangurde

How Many SIM on Aadhar Card :

सध्याच्या काळात सीम कार्डची गरज लपून राहिलेली नाही. सीम कार्डविना कोणताही स्मार्टफोन किंवा फोन वापरता येत नाही. काही दिवसांपूर्वी टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने सीम कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. Sim Swap केल्यानंतर सीमकार्डला ७ दिवसापर्यंत दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करता येणार नाही. एक जुलैपासून हा नवीन नियम लागू होणार आहे. तसेच तुमच्या नावाने कोणी सीमकार्ड वापरत आहेत का, याबाबतची माहिती एका मिनिटात उपलब्ध होऊ शकते. (Latest Marathi News)

स्कॅमर्सकडून दुसऱ्याच्या आधारकार्डचा वापर करून सीमकार्ड वापरण्याचा प्रकार वाढू लागला आहे. या सीमकार्डचा वापर करून स्कॅमर्सकडून सायबर स्कॅम करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही स्कॅमर्सकडून आपल्या नावाच्या सीमकार्डचा देशविरोधी कारवाईसाठीही वापर केला जाऊ शकतो. या कारणात्सव त्यामुळे तुमच्या नावाने किंवा आधारकार्डच्या वापर करून किती जण सीमकार्ड वापरत आहेत, याबद्दल सहज माहिती मिळू शकते.

तुमच्या नावाने सीमकार्ड कोण वापरतंय?

तुमच्या नावाने कोणी सीमकार्ड वापरत असेल, तर त्याची माहिती (tafcop.sancharsaathi.gov.in) वापर होऊ शकतो. तुम्ही एकदा या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर Citizen Centric Services वर जाऊन टॅप करा. त्यानंतर Know Your mobile connections वर जाऊन क्लिक करा. तुम्ही मोबाईलवरही कनेक्शन पाहू शकता.

तुम्ही सुरुवातीला १० अंकी मोबाईल नंबर टाइप करा. त्यानंतर कॅप्चे टाइप करा. पुढे तुमच्या नंबरवर ओटीपी नंबर येईल. तो ओटीपीनंबर टाईप करा. त्यानंतर संपूर्ण माहिती स्क्रिनवर येईल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावाने किती जण सीमकार्ड वापरत आहे, याची माहिती दिसेल.

तुम्ही वापरत नसलेले नंबर दिसल्यास तातडीने त्या नंबरला रिपोर्ट करू शकता. तुम्ही रिपोर्ट करून तो नंबर बंद करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT