Summer Car Care Tips, How To Care Your Car In Summer Season
Summer Car Care Tips, How To Care Your Car In Summer Season Saam Tv
लाईफस्टाईल

Summer Car Care Tips : रखरखत्या उन्हात कशी घ्याल कारची काळजी, या सोप्या टीप्स फॉलो करा

कोमल दामुद्रे

Car Care Tips :

उन्हाळा सुरु झाला की, जितकी आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते तितकीच उपकरणांची देखील. कारण उन्हाळ्यात वाहनांचे इंजिन अधिक गरम होते. तसेच टायर खराब होण्याचा धोकाही अधिक असतो.

कडक उन्हामुळे आणि आर्द्रतेमुळे कारच्या आतील तापमान वाढते. ज्यामुळे प्रवास तर खराब होतो तसेच कारची काळजी (Care) देखील घ्यावी लागते. आम्ही काही सोप्या टीप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारची काळजी (Car) घेऊ शकता.

उन्हाळ्यात (Summer Season) कारची काळजी घेतल्यास बाहेरच्या भागांसोबत त्याचे इंजिन देखील चांगल्या प्रकारे काम करते. इंजिन चांगले असेल तर कार व्यवस्थितरित्या चालवू शकतो.

1. अशी घ्या काळजी

कारचा बाह्य भाग सूर्याच्या उष्णतेमुळे खराब होऊ शकतो. कारच्या रंगांवर याचा परिणामही होऊ शकतो. यामुळे पेंटचा कलर फिकट होण्याची शक्यता जास्त असते. बाहेरील भागाचे संरक्षण करण्यासाठी कार धुवून त्याला मेण लावा. यामुळे कारवर एक थर तयार होईल आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करेल. तसेच कारला सावलीत उभे करा, त्याला कव्हर देखील घाला.

2. इंजिनची काळजी घ्या

कारचा सर्वात महत्त्वाचा भाग इंजिन. उन्हाळ्यात कारचे इंजिन जास्त गरम होते. यासाठी कूलिंग सिस्टम चेक करणे महत्त्वाचे आहे. यासाठी कारमधील कूलंटची पातळी देखील नियमितपणे तपासायला हवी. याशिवाय कूलिंग सिस्टमच्या गळतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

3. कारच्या आतील भाग

कडक उन्हामुळे तुमच्या कारच्या आतील भागला गरम करते. त्यामुळे गाडीत बसणे कठीण होते. यासाठी तुम्ही विंडशील्ड आणि खिडक्यांवर सन शेड्स वापरु शकता. यामुळे कारच्या आतील भाग थंड राहातो. ज्यामुळे डॅशबोर्डमध्ये क्रॅक होणार नाहीत. तुम्ही व्हॅक्यूम क्लीनिंग आणि डस्टिंगसह कारची काळजी घेऊ शकता.

4. टायरची काळजी

रखरखत्या उन्हामुळे टायरची फुटण्याची भीती अधिक असते. अशावेळी टायरची हवा वेळोवेळी चेक करा. उच्च तापमानात हवेचा दाब सतत बदलत असतो. यासाठी कंपनीने सांगितलेल्या पातळीनुसार टायरमध्ये हवा भरा. यामुळे टायर अधिक सुरक्षित राहिल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT