Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलांची परीक्षा संपली, घरात बसून कंटाळले? अशाप्रकारे ठेवा व्यस्त

Keep Children Busy After Exam : बारावीच्या मुलांच्या परीक्षा संपल्या असून लवकरच दहावीच्या संपतील. परीक्षा संपल्यानंतर मुलांच्या मनावरील ताण कमी होतो. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक वेळ असतो.

कोमल दामुद्रे

How To Busy Your Child After Exam :

बारावीच्या मुलांच्या परीक्षा संपल्या असून लवकरच दहावीच्या संपतील. परीक्षा संपल्यानंतर मुलांच्या मनावरील ताण कमी होतो. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक वेळ असतो.

शाळा आणि अभ्यासातून सुटका मिळाल्यामुळे त्यांना काही प्रमाणात बरे वाटते. पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहातो. दिवसभर काय करायचे? सतत बसून राहाणे किंवा काहीच न करणे त्यांना जमत नाही. त्यामुळे त्यांची अधिक चिडचिड होते. घरात बसून राहाणे किंवा दिवसभर बाहेर खेळून त्यांना वैताग येतो. काही मुले (Child) तासनतास टीव्ही, मोबाईल फोन पाहात बसतात.

पालकांनी (Parents) या संधीचा फायदा घेऊन मुलांना घरातील कामे करायला सांगू शकतात. तसेच तुमच्या नात्याला (Relation) समजून घेण्यासाठी हा वेळ देखील चांगला असतो. पालकांनी अशावेळी काय करायला हवे जाणून घेऊया.

1. छंद जोपासायला सांगा

प्रत्येक मुलाला काही ना काही करण्याची आवड असते. काहींना चित्र काढायला आवडते तर काहींना डान्स करायला. अशावेळी मुलांना त्यांना त्यांचे छंद जोपासण्यास प्रोत्साहन करा.

2. नवीन कौशल्य

मुलांना आवडणाऱ्या गोष्टी शिकवा. त्यांच्या असणाऱ्या कलागुणांना वाव द्या. ज्यामुळे सुट्टीच्या काळात नवीन कौशल्य विकसित करता येतील. यासाठी तुम्ही त्यांना क्लासला लावू शकता.

3. बाहेर फिरायला घेऊन जा

मुलांना स्क्रीन टाइमपासून लांब ठेवायचे असेल तर त्यांना निसर्गाशी संपर्क साधायला सांगा. झाडे लावणे, त्यांची काळजी घेणे. नवीन ठिकाणे फिरणे, त्या ठिकाणी काय पाहायला मिळाले. ट्रेकिंगला घेऊन जा ज्यामुळे त्यांना बाहेरच्या वातावरणाची गोडी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT