वाढत्या वयात मुलांचा आत्मविश्वास वाढू लागतो. प्रत्येक पालकाला असे वाटते की, आपल्या मुलांने काही तरी चांगले करावे. त्यांचे नाव उज्जवल करावे. कोणतेही काम न घाबरता करायला हवे.
मुलांना आत्मविश्वासाने जीवनातील प्रत्येक आव्हानावर मात करायला हवी. मुले जसजशी मोठी होतात तसतशी पालकांची जबाबदारी वाढते. त्याचवेळी मुलांचे संगोपन करणे पालकांसाठी अधिक कठीण होते. कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना (Parents) मुलांकडे व्यवस्थितरित्या लक्ष देता येत नाही. परंतु, जेव्हा तुमची मुले (Kids) वयात येतील तेव्हा पालकांनी मुलांना या ५ गोष्टी नक्की शिकवायला हव्या. जाणून घेऊया त्याबद्दल
1. प्रवास
मुलांच्या सतत मागे-पुढे केली की, त्यांना पालकांची सवय लागते. त्यासाठी वाढत्या वयात त्यांना थोडा स्पेस द्या. मित्रांसोबत बाहेर पाठवा किंवा त्यांना एखाद्या लांब अशा सहलीला जाऊ द्या. ज्यामुळे ते एकटा प्रवास (Travel) करायला शिकतील. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि ते तुमच्यावर कमी प्रमाणात अवलंबून राहातील.
2. स्कूटी किंवा बाईक चालवणे
पालकांना मुलांना भित्रे बनवू नये. वय वाढू लागले की, अनेकदा मुले हट्ट करतात स्कूटी किंवा बाईक चालवायची आहे. अशावेळी पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवायला हवा. या वयात मुले खूप लवकर शिकतात. त्यांच्यात भीतीची भावना कमी होते.
3. पैशांचे व्यवस्थापन
चांगले जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी मुलांना पैसे कसे खर्च करायचे आणि कसे जमवायचे याचे ज्ञान द्या. कॉलजेमध्ये जाताना मुलांना पॉकेटमनी मिळतो. अशावेळी मुलांना पैशांची किंमत करायला शिकवा. खर्च करण्यासोबतच पैसे वाचवण्याकडेही लक्ष द्यायला सांगा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.