लाईफस्टाईल

Chanakya Niti On Time Management : कमी वेळात कसे व्हाल श्रीमंत? चाणक्याच्या या 5 टिप्स लक्षात ठेवा

How To Become Rich : जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम घेणे देखील गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Time Management : आयुष्यात वेळेचे नियोजन हे अधिक महत्त्वाच असतं. वेळेच गणित चुकलं की, इतर अनेक गोष्टी चुकतात. त्यासाठी वेळ देखील पाळणे महत्त्वाची असते. जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम घेणे देखील गरजेचे आहे.

काही लोक यशस्वी (Success) व श्रीमंत होण्यासाठी शॉट कटचा अवलंब करतात. परंतु, यासाठी ते लोक अनेक वाईट मार्गाचा अवलंब करतात ज्यामुळे याद्वारे पैसे कमवतात. पण असा पैसा अधिक काळ टिकत नाही. कमावलेला पैसा (Money) काही काळानंतर नष्ट होतो. त्यासाठी सत्याचा मार्ग अवलंबून संपत्ती कमावली पाहिजे. जर तुम्हालाही कमी वेळात श्रीमंत व्हायचे असेल तर आचार्य चाणक्यांच्या या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. जाणून घेऊया त्याबद्दल

1. कमी वेळेत श्रीमंत (Rich) व्हायचे असेल तर नक्कीच पैसे वाचवा. त्याच वेळी, सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवा. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तसेच, कठीण प्रसंगी पैसाही कामी येतो. असे लोक जीवनात नेहमी आनंदी राहतात.

2. आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने नेहमी धार्मिक ग्रंथांचे पठण केले पाहिजे. यामुळे व्यक्ती वाईट कर्मांपासून दूर राहते. जे लोक सत्याचे पालन करून पैसे कमावतात ते नेहमी आनंदी राहतात. त्यांच्या संपत्तीत नेहमीच वाढ होत असते. दुसरीकडे, वाईट कर्म करून संपत्ती जमा करणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. कालांतराने त्यांची संपत्ती नष्ट होते. त्यासाठी धर्माचा मार्ग अवलंबून पैसा कमवा.

3. आचार्य चाणक्य म्हणतात की जो व्यक्ती विषातून अमृत काढतो. त्याला श्रीमंत होण्यापासून काहीही रोखू शकत नाही. सांगायचे तर, एखाद्याने अस्वच्छ ठिकाणी पडलेले सोने उचलले तर तो नक्कीच श्रीमंत होतो. त्याचप्रमाणे जातीवरुन कोणी तुम्हाला यशस्वी होण्याचा उपदेश करत असेल आणि तुम्ही ज्ञान आत्मसात केले तर तुम्ही भाग्यवान आहात. ते ज्ञान तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल.

4. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर गोड बोला. आचार्य चाणक्य म्हणतात की गोड बोलणाऱ्या लोकांना करिअर आणि व्यवसायात लवकर यश मिळते. दुसरीकडे, जे लोक कडू बोलतात ते जीवनात नेहमीच अपयशी ठरतात. इतरांना त्यांच्या बोलण्याने आणि वागण्याने राग येतो. यासाठी करिअर आणि बिझनेसमध्ये यश मिळवण्यासाठी व्यक्तीने मृदुभाषी असणे आवश्यक आहे.

5. आपले ध्येय हे सिंहाप्रमाणे असायला हवे त्यासाठी तसेच लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे एखाद्या व्यक्तीला ध्येय साध्य करण्यास मदत करते. शिकार करताना सिंह शेवटच्या क्षणापर्यंत एकाग्र राहतो. यामुळे सिंहाला शिकार करण्यात नेहमीच यश मिळते. त्याच प्रकारे ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्तीने सर्व वेळ लक्ष केंद्रित केले पाहिजे. या नियमांचे पालन केल्यास कमी वेळेत यश मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT