लाईफस्टाईल

World Physiotherapy Day : बाळंतपणानंतर पाठदुखी, कमजोरी आणि डिप्रेशनमुळे त्रस्त आहात? मग फिजिओथेरपी ठरेल सगळ्यात बेस्ट ऑपशन

Physiotherapy : बाळंतपणानंतर पाठदुखी, कमजोरी आणि डिप्रेशनसारख्या समस्यांवर फिजिओथेरपी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तज्ज्ञ सांगतात की योग्य व्यायामामुळे महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते.

Sakshi Sunil Jadhav

  1. बाळंतपणानंतर पाठदुखी, कमजोरी व डिप्रेशन ही सामान्य समस्या आहे.

  2. फिजिओथेरपीमुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीर पुन्हा तंदुरुस्त होते.

  3. श्वसन व्यायाम व योगासनांमुळे मानसिक आरोग्य सुधारते.

  4. तज्ज्ञांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घेतल्यास आईचे दीर्घकालीन आरोग्य सुरक्षित राहते.

प्रत्येक महिलेचे आई होण्याचे स्वप्न असते. आई होण्यासाठी महिलेला ९ महिने स्वत:ला खूप जपावे लागते. कारण बाळंतपण हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा मानला जातो. मात्र या काळानंतर अनेक महिलांना शारीरिक तसेच मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. पाठदुखी, पोटदुखी, सांध्यातील वेदना, स्नायू सैल होणे अशा समस्या सामान्य आहेत. याचबरोबर काही महिलांना Postpartum Depression चा त्रासही होतो. तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी योग्य फिजिओथेरपी केल्यास महिलांचे आरोग्य लवकर सुधारू शकते.

आज म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी जागतिक भौतिकउपचार दिन( World Physiotherapy Day)साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाची संकल्पना 'हेल्दी एजिंग' अशी आहे. भौतिकउपचाराचा वापर गर्भवती महिलांसाठी अत्यंत आवश्यक मानला जातो. फिजिओथेरपिस्ट सांगतात की, बाळंतपणानंतर शरीरातील हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. यामुळे शारीरिक कमजोरी, थकवा आणि वेदना जाणवतात. फिजिओथेरपीतील पेल्विक फ्लोर वर्कआउट्स महिलांसाठी विशेष फायदेशीर ठरतात. या व्यायामामुळे स्नायू मजबूत होतात, मूत्रसंस्थेवरील ताण कमी होतो आणि शरीर मुळ अवस्थेत येते.

याशिवाय साधे श्वसन व्यायाम, हलके स्ट्रेचिंग, योगासने यांचा समावेश केल्यास मानसिक तणाव कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, यामुळे Postpartum depression वरही सकारात्मक परिणाम होतो. नियमित फिजिओथेरपीमुळे आईला पुन्हा ऊर्जा मिळते आणि दैनंदिन कामे सहज पार पाडता येतात.

आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, बाळंतपणानंतर महिलांनी स्वतःची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे जितके बाळाची. योग्य वेळी फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेतल्यास दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदना किंवा मानसिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. त्यामुळे महिलांनी हा उपचार भाग आपल्या जीवनशैलीत नक्कीच सामील करावा.

बाळंतपणानंतर पाठदुखीचा त्रास का वाढतो?

हार्मोनल बदल, स्नायू सैल होणे आणि शारीरिक थकवा यामुळे महिलांना बाळंतपणानंतर पाठदुखीचा त्रास होतो.

फिजिओथेरपीने काय फायदे होतात?

स्नायू मजबूत होतात, वेदना कमी होतात, मूत्रसंस्थेवरील ताण कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.

Postpartum depression वर फिजिओथेरपी मदत करते का?

होय, श्वसन व्यायाम, हलके स्ट्रेचिंग आणि योगासने मानसिक तणाव कमी करून डिप्रेशनवर सकारात्मक परिणाम करतात.

फिजिओथेरपी कधी सुरू करावी?

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रसूतीनंतर योग्य वेळी फिजिओथेरपी सुरू केल्यास दीर्घकालीन त्रास टाळता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India's Got Talentच्या मंचावर शहनाज गिलला आली सिद्धार्थ शुक्लाची आठवण, रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Breakfast Tips: कमी वेळ अन् हेल्दी नाश्ता; सकाळच्या घाईगडबडीत बनवा 'हे' पदार्थ, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाकडून भाजपच्या आमदाराच्या हत्येची सुपारी; अंबादास दानवेंनी फोडला बॉम्ब

Flight Rules: गुड न्यूज! DGCA ने तिकिटासंदर्भात आणले नवीन नियम, विमान प्रवाशांना होणार मोठा फायदा; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT