Diabetes Care : डायबिटीजमध्ये गोड खाणे शक्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Healthy Sweets : डायबिटीजमध्ये गोड खाणे अशक्य नाही. आहारतज्ज्ञ सांगतात की खजूर, अंजीर, मध, स्टेव्हिया यांसारख्या नैसर्गिक पर्यायाने गोड बनवले, तर मधुमेही रुग्ण सुरक्षितपणे खाऊ शकतात.
Healthy Sweets
Diabetes Caregoogle
Published On
Summary
  • गोड खाणे डायबिटीजमध्ये अशक्य नाही, पण मर्यादित असावे.

  • साखरेऐवजी खजूर, अंजीर, मध, स्टेव्हिया यांचा वापर फायदेशीर.

  • आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय गोड पदार्थांचा समावेश टाळावा.

  • संतुलित व नैसर्गिक गोड पदार्थ शरीराला फायबर, जीवनसत्त्वेही देतात.

डायबिटीजच्या रुग्णांनी गोड पदार्थ खाणे अत्यंत चुकीचे मानले जाते. कारण डायबिटीजचे मुळ कारण म्हणजे गोड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे असे आहे. त्यामुळे गोड पदार्थांपासून कायमचे अंतर ठेवावे लागते. अशी समजूत अनेकांच्या मनात आहे. मात्र आहारतज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने आणि संतुलित प्रमाणात बनवलेले गोड पदार्थ मधुमेही रुग्णही खाऊ शकतात.

तज्ज्ञ सांगतात की, साखरेऐवजी नैसर्गिक पद्धतीने गोड असलेले पदार्थ मेधुमेही सेवन करु शकतात. खजूर, अंजीर, मध, स्टीव्हिया यांसारख्या नैसर्गिक पर्यायांचा गोड पदार्थ बनवताना वापर केला, तर रक्तातील साखरेवर फारसा वाईट परिणाम होत नाही. याशिवाय हे पदार्थ शरीराला फायबर, खनिजे व जीवनसत्त्वेही देतात.

Healthy Sweets
Stomach Cancer : वजन कमी, पोट दुखी जळजळ आणि अस्वस्थता जाणवतेय? स्टेज 1 कॅन्सरची हेच तर लक्षण नाही? जाणून घ्या

उदाहरणार्थ, जर साखर वापरून लाडू करण्याऐवजी खजूर-ड्रायफ्रूटचा वापर करुन लाडू बनवत असाल. तर त्यासाठी खजूराचे तुकडे करून ते थोडेसे तुपात परतवावे. त्यात बदाम, काजू, अक्रोड यांसारखे सुकेमेवे टाकून मिश्रण घट्ट करावे. नंतर छोटे लाडू वळले की स्वादिष्ट आणि पौष्टिक खजूर-ड्रायफ्रूट लाडू तयार होतात. यामध्ये साखरेचा वापर अजिबात नसल्याने हे लाडू मधुमेही रुग्ण निश्चितपणे खाऊ शकतात.

Healthy Sweets
Passport Free Travel : या देशात फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्ट, भारतापेक्षाही कमी असेल खर्च

तसेच गाजर हलवा किंवा शेवया खीर यांसारख्या पदार्थात थोडे दूध, साखरेऐवजी स्टीव्हिया किंवा मधाचा वापर करून गोडवा आणता येतो. आहारतज्ज्ञांच्या मते, प्रमाण महत्त्वाचे आहे. गोड पदार्थ जरी नैसर्गिक पर्यायाने बनवले तरी त्याचा अतिरेक टाळावा. मधुमेही रुग्णांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गोड पदार्थांचा समावेश आहारात केला, तर ते योग्य आणि आरोग्यदायी ठरू शकते. त्यामुळे मधुमेहात गोड खाणे अशक्य नाही, तर योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण हेच त्याचे रहस्य आहे.

Q

डायबिटीज रुग्ण गोड खाऊ शकतात का?

A

होय, पण योग्य प्रमाणात आणि नैसर्गिक गोड पर्याय वापरले तर ते सुरक्षित ठरते.

Q

कोणते गोड पर्याय मधुमेहात योग्य आहेत?

A

खजूर, अंजीर, मध, स्टेव्हिया यांसारखे पर्याय आहारतज्ज्ञ सुचवतात.

Q

साखरेचे गोड पदार्थ का टाळावेत?

A

साखर रक्तातील साखर पटकन वाढवते आणि डायबिटीज नियंत्रण बिघडवते.

Q

नैसर्गिक गोड पदार्थ किती प्रमाणात खावेत?

A

मर्यादित प्रमाणात व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सेवन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com