Yoga For Weight Loss  Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga For Weight Loss : जिमला जाण्याचा कंटाळा तरीही वजन कमी करायचंय? घरबसल्या करा हे योगासन

पवनमुक्तासन प्रचंड फायदे : सध्याच्या युगात पोटाची चरबी आणि वाढत्या वजनामुळे अनेकांना त्रास होतो, म्हणून आज आम्ही पवनमुक्तासनाचे फायदे घेऊन आलो आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pawanmuktasana Yoga :

सध्याच्या युगात बदलत्या जिवनशैलीमुळे पोटाची चरबी आणि वाढत्या वजनामुळे अनेकांना त्रास होतो, म्हणून आज पवनमुक्तासनाचे फायदे पाहूयात. हे आसन पोटातील जडपणा कमी करण्यास, रक्ताभिसरण वाढविण्यास, मज्जासंस्था उत्तेजित करण्यास आणि पोटातील वायू बाहेर काढण्यास मदत करते. यासोबतच शरीरातील हानिकारक टॉक्सिन्सही काढून टाकतात. पवनमुक्तासन करण्याचे फायदे (Benefits) आणि ते करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.

पवनमुक्तासन म्हणजे काय?

पवनमुक्तासन हा वारा आणि मुक्त या दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे. यामध्ये पवनचा अर्थ 'वारा' आणि मुक्तचा अर्थ 'निघणे' असा आहे. पवनमुक्तासन ही आरामदायी मुद्रा आहे, जी प्रत्येकासाठी योग्य आहे.

पवनमुक्तासन करण्याचा योग्य पद्धत

  • हा योग (Yoga) करण्यासाठी पाठीवर झोपून श्वास घ्या.

  • आता पायाचे गुडघे वाकवून दोन्ही हातांची बोटे काही अंतरावर ठेवा.

  • यानंतर गुडघा पोटाजवळ ठेवा.

  • आता श्वास सोडताना गुडघे छातीकडे न्या.

  • नंतर पोटात आणताना हाताने मांड्या दाबा.

  • 10 सेकंद श्वास रोखून ठेवा आणि या स्थितीत रहा आणि नंतर पाय सरळ करा.

  • हीच प्रक्रिया दुसऱ्या पायाने करा.

  • या आसनाच्या 2-3 फेऱ्या करा आणि मग आराम करा.

पवनमुक्तासनाचे प्रचंड फायदे

  • पोटाची नको असलेली चरबी कमी करण्यासाठी पवनमुक्तासन देखील खूप उपयुक्त आहे.

  • या आसनामुळे गर्भाशयाशी संबंधित आजार (Disease) दूर होण्यास मदत होते.

  • पाठदुखी आणि स्लिप डिस्कची समस्या असल्यास त्याचा सराव फायदेशीर ठरतो.

  • अ‍ॅसिडीटी, सांधेदुखी आणि हृदयविकाराचा त्रास असलेल्यांसाठीही हे आसन फायदेशीर आहे.

  • हे आसन आतड्याला अनेक विकारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

  • हे आसन केल्याने यकृतही आपले काम योग्य प्रकारे करते.

या लोकांनी हे आसन करू नये

  • उच्च रक्तदाब असलेले लोक

  • हर्निया असलेले लोक

  • स्लिप डिस्क असलेले लोक

  • हृदयाच्या समस्या असलेले लोक

  • मान आणि पाठदुखी असलेले लोक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT