sleep requirement by age google
लाईफस्टाईल

Sleep Tips: तुमच्या शरीराला किती वेळ झोप आवश्यक आहे? वय किती, तास किती जाणून घ्या

Sleep Awareness: वयानुसार शरीराला किती झोप आवश्यक आहे, कमी झोपेचे धोके, तज्ज्ञांचा सल्ला आणि चांगली झोप मिळवण्यासाठी उपयुक्त सवयी जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

दिवसभर कामासाठी पोटापाण्यासाठी धावपळ केल्यानंतर शरीर, मेंदू आणि मनाला विश्रांतीची गरज असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा एनर्जीने काम करण्यासाठी तुम्हाला झोप आवश्यक आहेच. पण या धावपळीत तुम्हाला जर कमी झोप मिळत असेल तर तुम्ही नकळत तुमच्या आरोग्याचं नुकसान करून घेत आहात. झोप ही ईच्छेवर अवलंबून नसून ती आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. असं संशोधनांमधून असं स्पष्ट झालंय.

तज्ज्ञांच्या मते, फक्त लहान मुलांनाच नाही तर प्रौढांना सुद्धा पुरेशी झोप गरजेची असते. तुमच्या जन्मापासून म्हातारपणापर्यंत यात खूप बदल होतात. नुकत्याच जन्मलेल्या बाळांना दररोज १४ ते १७ तासांची झोप हवी असते आणि ही झोप थोड्या थोड्या वेळाची असते. याला तुटक स्वरुपाची सुद्धा म्हणू शकतो.

चार ते अकरा महिन्यांच्या बाळांना रात्री थोडी सलग झोप मिळायला सुरुवात होते. हे वय तुटक स्वरुपाची झोप कमी करतं. तरीही दिवसा झोपणं आवश्यक असतं. एक ते दोन वर्षांच्या लहान मुलांसाठी ११ ते १४ तासांची झोप आवश्यक असते. तीन ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये डुलकी कमी होत जाते, त्यामुळे ठराविक वेळेची झोपेची सवय फायदेशीर ठरते.

सहा ते बारा वयोगटातील मुलांसाठी ९ ते १२ तासांची झोप स्मरणशक्ती आणि शारीरिक वाढीसाठी आवश्यक असते. तेरा ते अठरा वयोगटातील किशोरवयीन मुलांना शरीरघड्याळ उशिरा झोपण्याची सवय लावतं. तरी त्यांना ८ ते १० तासांची झोप गरजेची असते. अठरा ते ६४ वयोगटातील प्रौढांसाठी ७ ते ९ तासांची झोप गरजेची असते. पंच्याहत्तर वर्षांनंतर झोप हलकी होत असली तरी सात ते आठ तासांची झोप मेंदूच्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

चांगली झोप मिळण्यासाठी दररोज, सुट्टीच्या दिवशीसुद्धा, झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवणं गरजेचं आहे. झोपण्याआधी मोबाईल, टीव्ही यांसारख्या स्क्रीनपासून दूर राहणं, खोलीत लाइट बंद करून राहणं, शांत वातावरण आणि थोडं थंड तापमान ठेवणं फायदेशीर ठरतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: गुड न्यूज! हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवास होणार गारेगार; २६ जानेवारीपासून एसी लोकल धावणार; वाचा वेळापत्रक

Hirvya Mugachi Bhaji: अस्सल गावरान पद्धतीची हिरव्या मुगाची भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: चिपळूणमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार रमेश कदम यांचा पक्षाचा राजीनामा

मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाट्टेल ते... चांदीच्या वाट्या वाटल्या, VIDEO

RailOne अ‍ॅपवरुन रेल्वेचं तिकीट बुक करा अन् ३ टक्के डिस्काउंट मिळवा; आजपासून सुविधा सुरु

SCROLL FOR NEXT