Cash Limit at Home saam tv
लाईफस्टाईल

Cash Limit at Home : घरात किती रोख रक्कम ठेवता येते? जाणून घ्या काय आहेत सरकारचे नियम

Cash Store Rules in India : घरात किती रोख रक्कम ठेवता येते? जाणून घ्या काय आहेत सरकारचे नियम

Satish Kengar

Cash Limit at Home : नोटबंदीनंतर देशात डिजिटल व्यवहारांचा कल खूप वाढला आहे. आता लोक बहुतेक व्यवहार UPI आणि डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे करत आहेत. असं असलं तरी आजही अनेक असे लोक आहेत, जे रोखीने व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.

यासाठी लोक एकाच वेळी एटीएममधून अधिक पैसे काढतात. मात्र तुम्हाला माहित आहे का, घरात जास्तीत जास्त किती रोख रक्कम (Cash Limit at Home) ठेवता येते? जर या संबंधित नियम माहित नसल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

घरात रोख रक्कम ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागाचे नेमके काय आहे नियम? याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. (Latest Marathi News)

घरात किती रोख रक्कम ठेवू शकता?

प्राप्तिकराच्या नियमांनुसार (Income Tax) तुम्हाला हवी तेवढी रोकड घरात ठेवता येते. पण तुमच्या घरात ठेवलेली रोकड कधी तपास यंत्रणेने पकडली तर तुम्हाला या रोख रकमेचा स्रोत सांगावा लागेल.

जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले नसतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. यासाठी तुमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरले असल्यास काळजी करण्याची गरज नाही.

तर दंड होऊ शकतो

जर तुम्ही घरात ठेवलेल्या रोख रकमेचा स्रोत सांगू शकत नसाल तर तपास यंत्रणा तुमच्यावर कारवाई करेल. तुमच्या अडचणी वाढू शकतात. दरम्यान, नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने असे म्हटले होते की, जर तुमच्याकडे अघोषित रोकड मिळाली, तर तुमच्याकडे जितकी रोकड मिळेल त्या रोख रकमेवर 137% पर्यंत कर लावला जाऊ शकतो.

एका वर्षात किती रोकड काढता येते?

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याने एकावेळी 50 हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम काढली, तर त्याला त्याचे पॅन कार्ड दाखवावे लागेल. तसेच एका वर्षात 20 लाखांहून अधिक रोख जमा किंवा काढता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT