back pain saam tv
लाईफस्टाईल

Back Pain: खुर्ची किंवा खराब पोस्चर नव्हे, मेंटल स्ट्रेसही बनू शकतो कंबरेच्या दुखण्याचं मोठं कारण

Mental Stress: पाठीचा आणि कंबरेचा त्रास फक्त चुकीच्या पोस्चरमुळे नव्हे तर मानसिक ताणामुळेही वाढतो. योग, ध्यान आणि योग्य बसण्याच्या सवयींनी या वेदनांवर नियंत्रण मिळवा.

Sakshi Sunil Jadhav

पाठीचा आणि कंबरेचा त्रास फक्त चुकीच्या पोस्चरमुळे नाही, तर मानसिक ताणामुळेही वाढतो.

ताण वाढल्याने कोर्टिसोल हार्मोन स्नायूंमध्ये वेदना निर्माण करतो.

योगा, ध्यान आणि नियमित व्यायाम ताण कमी करून स्नायू मजबूत करतात.

आजच्या काळात कंबरदुखी ही एक खूप सामान्य समस्या बनलीये. पूर्वी ही तक्रार वयोवृद्धांमध्ये आढळायची पण आता ती तरुणांपासून ते मुलांपर्यंत सगळ्यांमध्ये वाढताना दिसते. दिवसभर लॅपटॉपसमोर बसून काम करणं, मोबाईलवर बराचवेळ वाकून राहणं, शारीरिक हालचालींचा अभाव या सगळ्या सवयींमुळे आपल्या शरीरावर मोठा ताण येतो.

अनेकांना असं वाटतं की चुकीच्या पद्धतीने बसणं किंवा अयोग्य खुर्ची हीच कंबरदुखीची मुख्य कारणे आहेत. पण तज्ज्ञांच्या मते, चुकीचे पोस्चरच नाही तर मेंटल स्ट्रेस सुद्धा पाठीच्या आणि कंबरेच्या दुखण्यामागचं एक मोठं कारण ठरू शकतो.

आपलं मन आणि शरीर हे एकमेकांशी घट्टपणे जोडलेलं आहे. जेव्हा आपण ताण, टेन्शन किंवा नैराश्याच्या अवस्थेत असतो. तेव्हा हा मानसिक ताण शरीरावरही परिणाम करतो. शरीरातील वेदना, जडपणा किंवा जकडन हे मानसिक तणावाचेच कारण असू शकतं. सतत स्ट्रेसमध्ये राहिल्याने शरीरात कोर्टिसोल नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतं. या हार्मोनमुळे स्नायूंमध्ये जकडन, ताण आणि वेदना जाणवू लागतात. विशेषतः मानेच्या आणि कंबरेच्या भागात याचा परिणाम अधिक दिसून येतो.

मानसिक ताण वाढल्याने अनेकदा माणूस चुकीच्या पद्धतीने बसतो, झुकतो किंवा शरीर ढिलं ठेवतो, ज्यामुळे पाठीच्या कण्यावर दाब वाढतो. शिवाय, ताणाखाली असलेल्यांना झोप न लागणं किंवा झोप अपुरी राहणं ही देखील सामान्य गोष्ट असते. स्नायूंना पुरेसा आराम मिळत नाही आणि दुखणे वाढत जातं.

ताण आणि वेदनेच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काही सोपे उपाय नियमित फॉलो करू शकता. नियमित व्यायाम करणं, योगासने करणं आणि दररोज १० ते १५ मिनिटं ध्यान करणं हे मानसिक ताण कमी करण्यास मदत करतं. विशेषतः भुजंगासन, बालासन आणि कॅट-काऊ पोज सारखी आसने पाठीच्या स्नायूंना बळकटी देतात.

काम करताना योग्य पोस्चरमध्ये बसणं, कंबरेला आधार देणारी खुर्ची वापरणं, पुरेशी झोप घेणं आणि प्रत्येक अर्ध्या तासाने थोडं चालणं किंवा स्ट्रेच करणं या सवयी अंगीकारल्यास मानसिक ताण आणि पाठीच्या वेदना दोन्हीपासून आराम मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT