How Much Sleep Do We Need saam tv
लाईफस्टाईल

Hours of sleep by age: वयोमानानुसार एका दिवसात किती तास झोप घेतली पाहिजे? स्लीप चार्ट पाहून ठरवा तुमची झोप पूर्ण होतेय का!

How Much Sleep Do We Need: अपुऱ्या झोपेमुळे आरोग्याच्या समस्या उद्धभवतात ते तज्ज्ञांनी तुम्हाला सांगितलं असेल. अशावेळी तुम्ही तुमच्या वयाच्या हिशोबाने पूर्ण झोप घेतली पाहिजे.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या दररोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपली झोप होतेच असं नाही. अपुऱ्या झोपेमुळे अनेक समस्या आपल्या मागे लागतात. दररोजचं काम आणि धावपळीमुळे झोप पूर्ण न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशातच तुम्हाला माहितीये का तुम्ही तुमच्या वयोमानानुसार, किती तासांची झोप घेतली पाहिजे?

नॅशनल स्लिप फाऊंडेशनच्या मतानुसार, तुम्ही हेल्दी आयुष्य जगण्यासाठी कमीत कमी ७ तासांची रात्रीची झोप घेणं महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर चांगल्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी तुम्हाला तुमच्या वयाच्या हिशोबाने झोपे घेणं गरजेचं आहे. आज या आर्टिकलमधून आपण जाणून घेऊया की, तुमच्या वयानुसार, तुम्ही किती तासांची झोप घेणं गरजेचं आहे.

वयानुसार तुम्ही किती झोप घेतली पाहिजे?

  • स्लीप फाऊंडेशनच्या मतानुसार, ४ ते १२ महिन्यांच्या बाळाने एका दिवसाला कमीत कमी १२ ते १६ तासांची झोप घेतली पाहिजे.

  • १ ते २ वर्षाच्या मुलाने एका दिवसात ११ ते १४ तास झोप घेणं गरजेचं आहे.

  • ज्यावेळी मूल प्रीनर्सरीमध्ये जातं म्हणजेच ३ ते ५ वर्षांच्या मुलांनी प्रत्येक दिवसाला ११ ते १४ तासांची झोप घेणं गरजेची आहे.

  • ६ ते १२ वर्षांच्या मुलांनी दर दिवसाला ९ ते १२ तासांची झोप घ्यावी. हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी योग्य असतं.

  • ज्यावेळी मुलं टीन एजमध्ये असतात तेव्हा त्यांनी ८ ते १० तासांची झोप ही घ्यायलाच पाहिजे.

  • वयाच्या १८ व्या वर्षानंतर कमीत कमी ७ तासांची झोप घेणं गरजेचं आहे.

  • ६० वर्षांच्या अधिक वयाच्या वृद्धांनी दिवसातून ७ ते ८ तासांची झोप घेतली आहे.

झोप पूर्ण झाल्याने मिळणारे फायदे

कमी झोप होत असेल तर तुम्हाला वजन वाढीची समस्या सतावू शकते. याशिवाय कमी झोपेचा तुमच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम होतो. शारीरिक आरोग्यासाठी झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. रात्री ७ तास झोप घेतल्याने तुमच्या हृदयाच्या समस्यांचा धोकाही कमी होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये प्रचाराच्या सांगते वेळी दुर्दैवी घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

Wednesday Horoscope: मकरसंक्रातीला या ४ राशींचं नशीब फळफळणार, कामात बढतीचेही योग; वाचा बुधवारचे राशीभविष्य

KDMC मध्ये २१ उमेदवार बिनविरोध, सत्ताही आमचीच येणार; मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलं गणित

saunf jeera water: दिवसाची सुरुवात बडीशेप आणि जीरा पाणी पिऊन करण्याचे काय फायदे आहेत?

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' चुका करू नका, होईल मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT