How Much Water Should You Drink Per Day saam tv
लाईफस्टाईल

Drinking Water: एका दिवसात किती ग्लास पाणी प्यायलं पाहिजे? जाणून घ्या लिमिट

How Much Water Should You Drink Per Day: एका निरोगी व्यक्तीने किती प्रमाणात पाण्याचं सेवन केलं पाहिजे? त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पाणी हे आपलं जीवन आहे. जर व्यक्तीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळालं नाही तर मृत्यूही ओढावू शकतो. मुळात पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवतं. तुमचं शरीर हायड्रेट असेल तर तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, संपूर्ण दिवसात किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे. एका निरोगी व्यक्तीने किती प्रमाणात पाण्याचं सेवन केलं पाहिजे, याबाबत माहिती जाणून घेऊया. जर तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी पित नसाल तर तुमच्या त्वचेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

त्वचेसाठी पाणी पिणं फार गरजेचं

त्वचा कोमल आणि उत्तम रहावी यासाठी आपण विविध पद्धतींचा अवलंब करतो. यासाठी आपण फेस मास्क, महागडे प्रोडक्ट तसंच ब्युटी पार्लरमध्येही जाऊन खर्च करतो. मात्र जर तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवत नसाल तर तुम्ही करत असलेल्या या गोष्टी वाया जाऊ शकतात. त्यामुळे त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे.

पाणी पिण्याचे स्किन बेनिफिट्स

  • ज्यावेळी तुम्ही वेगाने वजन घटवता तेव्हा तुमची त्वचा काही प्रमाणात सैल पडू लागते. अशावेळी लोकं कमी पाणी पिण्याची चूक करतात. मात्र असं कधीही करू नये. पाणी प्यायल्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहण्यात मदत होते. याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर ग्लो देखील येऊ शकतो.

  • तुमच्या त्वचेचा पीएच लेवल योग्य राखणं फार गरजेचं आहे. हाय पीएचमुळे त्वचा रूक्ष आणि कोरडी पडण्याचा धोका असतो. स्किनचा पीएच लेवल उत्तम राखण्यासाठी पाणी पिणं फार गरजेचं असतं.

  • शरीरात टॉक्सिन पदार्थांच्या उपस्थितीमुळे पुरळ, ऍलर्जी आणि त्वचा तेलकट होऊ शकते. हे टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे.

  • पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट राहण्यास मदत होते. वाढत्या वयाबरोबर त्वचा कोरडी पडू लागले. पण, पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा मॉइश्चराइज राहते.

एका दिवसात किती ग्लास पाणी प्यायलं पाहिजे?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका निरोगी प्रौढ व्यक्तीने मेटाबॉलिज्म, वजन, उंची आणि त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यायलं पाहिजे. यामुळे चमकदार आणि निरोगी राहते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपला

महालक्ष्मीला कुठे बसायचं कळतय... कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात; भरसभेत पंकजा मुंडे काय बोलून गेल्या? VIDEO

Palghar Travel : मुंबईजवळ ट्रेकिंग अन् हायकिंगचा आनंद घ्यायचाय? पालघरमधील 'हे' Hidden स्पॉट नक्की फिरून या

Seawood Darave : रेल्वेचा मोठा निर्णय, आणखी एका स्टेशनचं नामांतर, नाव बदलण्यामागचा इतिहास सांगितला!

Pune Accident : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये भीषण अपघात; दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT