Weight Loss Tips, How Many Calories Can Burn If walk 30 Min Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : दररोज अर्धा तास चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात? वजन कमी करण्यासाठी काय करायला हवे?

How Many Calories Can Burn If walk 30 Min : वजन कमी करण्यासाठी आपण दिवसभरात किती चालायला हवे. परंतु, वजन हे आपल्या चालण्याच्या गतीवर अवलंबून असते. वजनानुसार किती वेळ चालले पाहिजे. तसेच किती कॅलरीज बर्न होतात?

कोमल दामुद्रे

Morning Walk Benefits :

बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकजण वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. सध्याच्या जगात फिटनेस अधिक महत्त्वाचा आहे. त्यासाठी चालणे हा उत्तम पर्याय मानला जातो. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहात नाही तर अनेक आजारांपासून दूर राहाता येते.

अनेकांना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी आपण दिवसभरात किती चालायला हवे. परंतु, वजन हे आपल्या चालण्याच्या गतीवर अवलंबून असते. वजनानुसार किती वेळ (Time) चालले पाहिजे. तसेच किती कॅलरीज बर्न होतात? आहार (Diet) कसा असावा? जाणून घेऊया.

1. जर तुमचे वजन ५५ ते ६५ किलोच्या मध्ये असेल तर...

तुम्ही कमी वेगात चालत असाल तर १५ मिनिटांत ५० कॅलरी, ३० मिनिटांत १०० कॅलरी १ तासात २०० कॅलरीज आणि अधिक वेगात चालत असाल तर १५ मिनिटांत ९५ कॅलरीज, ३० मिनिटांत १८५ कॅलरी, १ तासात ३७० कॅलरी कमी होती.

2. वजन ६५ ते ७५ किलो दरम्यान असल्यास...

तुम्ही कमी वेगात चालत असाल तर १५ मिनिटांत ६० कॅलरी, ३० मिनिटांत ११२ कॅलरी तासभर चालल्याने २२५ कॅलरीज कमी होतील तर तुम्ही फास्ट चालत असाल १५ मिनिटांत १०० कॅलरी, २१४ कॅलरीज ३० मिनिटांत आणि एका तासात ४३० कॅलरीज बर्न होतात.

3. चालताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • वजन कमी (Weight Loss Tips) करण्यासाठी तुम्ही देखील मॉर्निंग करत असाल तर घोट्यात किंवा हातावर थोडे वजन घेऊन चालल्यास शरीराला चांगला आकार मिळतो. तसेच वजनही कमी होते.

  • चढ-उतार किंवा पायऱ्यांवर चालण्याचा प्रयत्न करा. यामुळे वजन कमी करण्यास फायदा होईल. शरीराची पुरेशी हालचाल होईल.

  • नियमितपणे स्वत:साठी एक लक्ष्य सेट करा. ज्यामुळे महिन्याभरात वाढलेले वजन आटोक्यात येईल. अनेक आजारांपासून दूरही राहाल.

  • वजन कमी करण्यासाठी शरीराची हालचाल जितकी महत्त्वाची आहे तितकाच आहारही महत्त्वाचा आहे. त्यासाठी जंक फूड, अनहेल्दी पदार्थाचे सेवन करु नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT