Dermatomyositis : किशोरवयीन मुलांमध्ये वाढतोय डर्माटोमायोसिटिसचा आजार, कशी घ्याल काळजी? तज्ज्ञांनी दिला सल्ला

Dermatomyositis Disease : डर्माटोमायोसिटिस हा एक दुर्मिळ असा रोग असून याने पेशींमध्ये जळजळ होते त्यामुळे स्नायू झपाट्याने कमकुवत होऊ लागतात आणि त्वचेवर पुरळ उठते.
Dermatomyositis
DermatomyositisSaam Tv
Published On

Dermatomyositis Symptoms In Adults :

डर्माटोमायोसिटिस हा एक दुर्मिळ असा रोग असून याने पेशींमध्ये जळजळ होते त्यामुळे स्नायू झपाट्याने कमकुवत होऊ लागतात आणि त्वचेवर पुरळ उठते. ही स्थिती कोणत्याही वयात उद्भवू शकते, सामान्यतः हा आजार प्रौढांमध्ये ४० ते ६० वर्ष आणि मुलांमध्ये ५ ते १५ वर्ष या वयोगटात दिसून येतो.

जेव्हा हे लहान मुलांमध्ये आढळते तेव्हा त्याला ज्युवेनाईल डर्माटोमायोसिटिस (जेडीएम) म्हणतात. या आजाराचं निदान करणं हे कठीण आहे. याची लक्षणं कधीकधी चटकन दिसतात, तर कधीकधी ही लक्षणं दिसायला खूप वेळ लागतो. निदानातील विलंबामुळे नुकसान होऊ शकते.

पुण्याच्या क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि बालरोग संधिवातशास्त्र, अल्फा सुपरस्पेशालिटी क्लिनिकच्या डाँ. हिमांशी चौधरी म्हणतात डर्माटोमायोसिटिसच्या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ येणे, जे सामान्यत: चेहरा, बोटं, कोपर, गुडघे, छाती आणि पाठीवर दिसून येतात. हे पुरळ जांभळ्या किंवा लालसर रंगापासून ते खपलीयुक्त पुरळ असू शकतात.

Dermatomyositis
Fairness Cream Side Effects : सावधान! फेअरनेस क्रीम वापरताय? होऊ शकतो किडनीवर परिणाम, तज्ज्ञांनी दिला सल्ला

त्वचेवर (Skin) पुरळ येण्याव्यतिरिक्त, डर्माटोमायोसिटिस असलेल्या व्यक्तींमध्ये अनेकदा स्नायू कमकुवत होतात यामध्ये नितंब, मांड्या, खांदे आणि दंड यांचा समावेश आहे. यामुळे बसलेल्या स्थितीतून अचानक उभे राहणे, पायऱ्या चढणे किंवा वस्तू उचलणे यासारख्या सामान्य क्रिया करतानाही अडचणी येऊ शकतात.

डर्माटोमायोसिटिसचे नेमके कारण माहित नसले तरी, हा एक स्वयंप्रतिकार विकार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्याच स्नायूंवर आणि त्वचेवर हल्ला करते. लवकर निदान आणि उपचाराने या आजाराचे (Disease) व्यवस्थापन करता येणे शक्य तसेच कॅल्सिनोसिस, फुफ्फुसाचा आजार यासारखी गुंतागुंत टाळण्यासाठी गरजेचे आहे.

Dermatomyositis
Summer Travel Plan : उन्हाळ्यात फिरण्याचा प्लान करताय? ही ८ पर्यटनस्थळे आहेत बेस्ट!

1. उपचारांमध्ये काय आहेत?

  • औषधोपचार: स्टिरॉईड्स ही उपचारांची पहिली पायरी ठरते, त्यानंतर आवश्यक असल्यास इतर इम्युनोसप्रेसिव्ह औषधे (Medicine) दिली जातात.

  • फिजीओ थेरेपी: स्नायूंची ताकद आणि कार्य सुधारण्यासाठी याची मदत होते

  • नियमित तपासणी: यामुळे भविष्यातील गुंतातगुंत रोखता येणे शक्य असून वेळीच निदानास मदत होते.

  • ज्युवेनाईल डर्माटोमायोसिटिस बाबत जनजागृती वाढवणे ही गरजेचे आहे. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार झाल्यास प्रभावित मुलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com